शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

'पुणे-ओकायामा मैत्री उद्यान हे पुणे व जपानच्या संस्कृतीचे प्रतीक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2018 14:24 IST

पु.ल देशपांडे उद्यानातील पुणे -ओकायामा मैत्री उद्यान हे पुणे व जपानच्या संस्कृतीचे प्रतीक आहे. पुण्यात बाहुलीचे कायमस्वरूपी प्रदर्शन संग्रहालय उभारण्याची इच्छा आहे.

 

पुणे- पु.ल देशपांडे उद्यानातील पुणे -ओकायामा मैत्री उद्यान हे पुणे व जपानच्या संस्कृतीचे प्रतीक आहे . पुण्यात बाहुलीचे कायमस्वरूपी प्रदर्शनसंग्रहालय उभारण्याची इच्छा आहे . ते लवकरच पूर्ण होईल, अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली.पुणे महापालिकेतर्फे सिंहगड रस्त्यावरील उभारलेल्या पु . ल . देशपांडे उद्यानांमधील पुणे -ओकायामा मैत्री उद्यानाचा ( जापनीज गार्डन )शुक्रवारी १२ वर्धापनदिन होता.असोसिएशन आॅफ फ्रेंड्स आॅफ जपान , पुणे व पुणे महापालिकेच्या उद्यान विभागातर्फे आज सकाळी ७ वाजतावर्धापनदिनानिमित्त उद्यानाचा वाढदिवस आयोजित केला होता. महापौर टिळक यांच्या हस्ते केक कापून उद्यानाचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.याप्रसंगी  असोसिएशन आॅफ फ्रेंड्स आॅफ जपान ,पुणेचे अध्यक्ष समीर खळे ,समन्यवयक श्रीमती स्मिता  भागवत , जपानमधील वाकायामा स्टेटचे प्रमुखसेईझो त्सुजी ,वाकायमा स्टेटचे प्रतिनिधी शिंजी आराई , ताकाओ ईईझावा, योजी यामासकी, नगरसेविका अनिता कांबळे , पुणे महापालिकेच्या उद्यानविभागाचे मुख्य अधीक्षक राजेंद्र  घोरपडे ,अधीक्षक संतोष कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समीर खळे यांनी  केले .यावेळी महापौरांनी व खळे यांनी सर्वांना केक देऊन वाढदिवसाचा आनंद साजरा केला .पुण़्याला  ऐतिहासिक व पुरातनदृष्ट्या प्रचंड महत्व आहे . अनेक ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यात आले आहे. या वास्तूंचे महत्व लक्षात घेऊन जपाननेपुण्यात पर्यटनास चालना व प्रोत्साहन देण्याचे आवाहन टिळक यांनी जपानमधील वाकायामा स्टेट मधील जपानच्या शिष्टमंडळाला दिले .जपानमधील वाकायामा स्टेटचे प्रमुख सेईजो त्सुजी म्हणाले, नुकतेच महाराष्ट्र शासन व वाकायामा स्टेट यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी सांस्कृतिक आर्थिक आदानप्रदान विषयक सामंजस्य करार केला आहे . या करारानुसार आम्ही काम करणार आहे . या करारांनंतर आम्ही पुणे शहरास भेट दिली . या परिसरातील काही कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा सुद्धा केली . पुण्यात पर्यटनास प्रोत्साहन देण्यासाठी जपान सरकारकडे आपण प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले .

टॅग्स :PuneपुणेJapanजपान