शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Pune: पालिकेने बजवलेली नोटिस चुकीची, बेकायदेशीर; उद्योजक पुनीत बालन यांनी दिलं उत्तर, नोटिस रद्द करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 22:41 IST

Pune News: दहीहंडी उत्सवात परवानगी न घेता ठिकठिकाणी जाहिराती लावून विद्रुपीकरण केल्याप्रकरणी पुणे महापालिकने  उद्योजक पुनीत बालन  यांना नोटीस बजावत तब्बल तीन कोटी 20 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.  

पुणे - दहीहंडी उत्सवात परवानगी न घेता ठिकठिकाणी जाहिराती लावून विद्रुपीकरण केल्याप्रकरणी पुणे महापालिकने  उद्योजक पुनीत बालन  यांना नोटीस बजावत तब्बल तीन कोटी 20 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.  या  नोटीसीला बालन यांनी उत्तर दिले असून, यात त्यांनी दिलेली नोटीस चुकीची व बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे.

शहरातील गणेशउत्सव कालावधीत रस्ता, पदपथावर उभारण्यात येणाऱ्या मान्य मापाच्या उत्सव मंडप / स्टेज करिता पूर्वीपासूनच कोणतेही परवाना शुल्क आकारण्यात येत नव्हते. तसेच सन 2019 पूर्वी स्थानिक पोलीस विभागाकडून मान्यता दिलेल्या स्वागत कमानी व रनिंग मंडप यांना आकारण्यात येत असलेले परवाना शुल्क देखील पालिका मुख्य सभा ठराव क्रमांक 564 अन्वये रद्द करण्यास मान्यता दिलेली  आहे. शहरात सन 2019 गणेशोउत्सव कालावधीत मोहरम / दहीहंडी आणि गणेशउत्सव मंडळाना ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने देण्यात आलेल्या नि: शुल्क परवानगी ही पुढील 5 वर्षा करिता म्हणजेच सन 2022 पासून सन 2027 सालापर्यंत गृहीतधरणे बाबत पुणे महापालिका, पुणेकडून सार्वजनिक गणेशउत्सव 2022 करिता सर्व गणेश मंडळे, पोलीस अधिकारी व मनपा अधिकारी यांची दिनांक 08 आगसट 2022 रोजी झालेल्या बैठकीत एकत्रित निर्णय घेण्यात आलेला होता.

या सर्व गोष्टींचा विचार करता पालिकेने  नोटीस ही माझे व्यक्तिमत्व बदनाम करण्यासाठी जाणूनबुजून  पाठवली आहे.  त्यामुळे दंडाची ही नोटीस रद्द करण्यात यावी  असेदेखील पुनीत बालन यांनी त्यांच्या उत्तरात म्हटले आहे

टॅग्स :Puneपुणे