शहरं
Join us  
Trending Stories
1
'पीएम मोदी गोष्टी लपवतात; ट्रम्प त्या उघड करतात', रशियन तेल खरेदीवरुन काँग्रेसचे टीकास्त्र
2
कोट्यवधींचं घबाड! १ कोटी कॅश, लाखोंचे दागिने, ८५ ATM; चहावाल्याचा पर्दाफाश, पोलीस हैराण
3
फ्लॅटमध्ये लिव्ह-इनमध्ये राहत होतं जोडपं, दिवाळीच्या दिवशी दुर्गंधी आल्यानं उघडला तर...; दृश्य पाहून सगळेच हादरले
4
भारताच्या 'या' स्कीममुळे शेजारी चीनला लागली मिरची; तक्रार घेऊन पोहोचला WTO च्या दरबारी
5
बदल्याची आग! "माझ्यासोबत तुझी बहीण पळून..."; टोमण्यांना कंटाळला, घेतला तरुणाचा जीव
6
VIRAL VIDEO : महिलेच्या केसांत अडकला हेअर कर्लर अन् पुढे जे झालं ते बघून तुम्हीही व्हाल हैराण!
7
महिला वर्ल्डकपमध्ये आता सेमीफायनलच्या एका जागेसाठी ३ संघांमध्ये चुरस, भारतासाठी असं आहे समीकरण
8
"सांसें उधार हैं... दिल तो महाकाल का है"; भस्म आरतीआधी भक्ताला हार्ट अटॅक, स्टेटसची चर्चा
9
जो जीव तोडून मेहनत घेतोय त्याला BCCI नं येड्यात काढलं? मुंबईकरासाठी बड्या राजकीय नेत्याची बॅटिंग
10
सलग ८८ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ₹१ लाखाचे झाले ₹२,६०,०००; तुमच्याकडे आहे का हा स्टॉक?
11
७ राशींवर कायम लक्ष्मी-कुबेर कृपा, पैसे कमीच पडत नाही; शुभ तेच घडते, तुमची रास आहे का यात?
12
समोश्यावरून वाद सुरू झाला अन् तलवारीच बाहेर निघाल्या! शेतकऱ्याच्या मृत्यूने परिसर हादरला
13
"समजलं तर ठीक, नाही तर...!", कॅनाडामध्ये पंजाबी सिंगर तेजी कहलोंवर गोळीबार; रोहित गोदारा गँगनं घेतली जबाबदारी
14
चित्रांगदा सिंह रुग्णालयात दाखल, ऐन दिवाळीत अभिनेत्रीची तब्येत बिघडली; नक्की झालं तरी काय?
15
प्रायव्हसी धोक्यात? 'Apple Maps' गुपचूप ट्रॅक करतंय तुमची प्रत्येक लोकेशन! लगेच बंद करा 'ही' सेटिंग
16
IND vs AUS : 'मी सचिनपेक्षाही अधिक धावा केल्या असत्या!' पण… ऑस्ट्रेलियन क्रिकेटरचा मोठा दावा
17
Happy Bhaubeej 2025 Wishes: भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status द्वारा द्या प्रेमळ नात्याच्या लडिवाळ शुभेच्छा!
18
लेडी सिंघम! १४ व्या वर्षी लग्न, १८ व्या वर्षी २ मुलांची आई; स्वप्न केलं साकार, झाली IPS ऑफिसर
19
PPF vs FD: पीपीएफ की एफडी, कुठे गुंतवणूक केल्यावर मिळेल मोठा फायदा? कोणता पर्याय करुन देऊ शकते तुफान कमाई
20
Ladki Bahin Yojana : खूशखबर! भाऊबीजेआधी लाडक्या बहि‍णींसाठी खास ओवाळणी; ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार?

पुण्यातील राजीव गांधी प्राणी उद्यानात १४ हरणांचा मृत्यू; नेमकं कारण काय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 14:15 IST

उद्यानामध्ये सध्या एकूण ९८ हरिणे होती. त्यामधील १४ हरणे मृत अवस्थेत आढळून आली असून, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पुणे - कात्रज येथील प्रसिद्ध राजीव गांधी प्राणी उद्यानात मागील चार ते पाच दिवसांत तब्बल १४ हरणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे वन्यजीवप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, प्राणी उद्यान प्रशासनालाही याचा मोठा धक्का बसला आहे.उद्यानामध्ये सध्या एकूण ९८ हरिणे होती. त्यामधील १४ हरणे मृत अवस्थेत आढळून आली असून, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही घटना समोर येताच प्राणी चिकित्सक तसेच वनविभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत.प्राथमिक अंदाजानुसार हरणांचा मृत्यू कोणत्यातरी विषाणूजन्य आजार, अन्नातील बिघाड किंवा अचानक हवामान बदल यामुळे झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याबाबत खात्रीशीर माहिती मिळवण्यासाठी मृत हरणांचे नमुने लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या तपासणी अहवालासाठी २ ते ३ दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.दरम्यान, या घटनेमुळे प्राणीप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, प्राणी उद्यानातील हरिणांच्या देखभाल व आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी  प्राणी प्रेम करन करण्यात येत आहे. राजीव गांधी प्राणी उद्यान हे पुणेकरांसाठी आणि पर्यटकांसाठी एक महत्त्वाचे आकर्षण केंद्र आहे. अशा ठिकाणी प्राण्यांच्या मृत्यूच्या घटनांनी उद्यान प्रशासनाची कार्यपद्धती आणि दक्षतेवर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

या घटनेबाबत राजीव गांधी प्राणी उद्यान आणि वन्यजीव संशोधन केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. घनश्याम पवार यांनी सांगितले की, प्राणी संग्रहालयात एवढ्या मोठ्या संख्येने हरीण मृत आढळून आल्याची ही पहिलीच घटना आहे. 

ते पुढे म्हणाले, ४-५ दिवसांपासून प्राणी संग्रहालयातील हरणांच्या मृत्यूच्या प्रमाणात वाढता होत आहे. रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे निदान तज्ज्ञांच्या पथकाने केले आहे. क्रांतिसिंह नाना पाटील कॉलेज ऑफ व्हेटरनरी सायन्स, शिरवळ यांनी १४ जुलै रोजी प्राणीसंग्रहालयाला भेट दिली. औंध येथील प्राणीसंग्रहालयात आम्ही अन्न, पाण्याचे नमुने आणि रक्ताचे नमुने विश्लेषणासाठी पाठवले आहेत, अशीही माहिती पवार यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड