शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

ZP School : बंद पडण्याच्या मार्गावर असलेली झेडपीची शाळा, आता जगातील सर्वोत्तम १० शाळांमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 14:23 IST

जालिंदरनगर जिल्हा परिषद शाळेचा वर्ल्ड बेस्ट स्कूल्स यादीत समावेश; भारतातील एकमेव शाळा ठरली

पुणे : खेड तालुक्यातील जालिंदरनगर येथील जिल्हा परिषद शाळेने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवला आहे. टी फोर एज्युकेशन या नामवंत संस्थेच्या जागतिक वर्ल्ड्स बेस्ट स्कूल प्राइज या स्पर्धेत जगभरातील लाखो शाळांमधून या शाळेने सर्वोत्तम १० शाळांमध्ये स्थान मिळवणारी भारताची एकमेव शाळा ठरली असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.पत्रकार परिषदेस शाळेच्या विद्यार्थिनी सुप्रिया दौंडकर, सह्याद्री पाटील, ग्रामस्थ चांगदेव झोंडगे, आशुतोष वाघ, मयूर कदम आदी उपस्थित होते. दत्तात्रय वारे म्हणाले, "टी फोर एज्युकेशन संस्थेमार्फत दरवर्षी ‘वर्ल्ड्स बेस्ट स्कूल प्राइज’ ही स्पर्धा आयोजित केली जाते. यामध्ये ‘लोकसहभागातून शाळा विकास’ या विभागात सहभाग घेतला होता. जगभरातील लाखो शाळांमधून जालिंदरनगर शाळेची निवड झाली असून, भारतातून ही एकमेव शाळा अंतिम फेरीत पोहोचली आहे. या अंतिम टप्प्यात १० शाळांपैकी एक शाळा ‘सर्वोत्तम शाळा’ म्हणून निवडली जाणार असून, विजेत्या शाळेला एक कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे.पूर्वी बंद पडण्याच्या मार्गावर असलेली ही शाळा आता अशा पातळीवर पोहोचली आहे की काही शहरांतील पालक आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी खेड्यात परतले आहेत. विद्यार्थ्यांची संख्या वाढली असून, गुणवत्ता यामध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. या यशात मुख्याध्यापक संदीप मसुडगे गुरूजी, शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद प्रशासन, व स्थानिक नागरिकांचा मोलाचा वाटा आहे.शाळेचा पुढील प्रवास अधिक बळकट करण्यासाठी नागरिकांनी https://vote.worldsbestschool.org/publicvote25/entry/2649 या संकेतस्थळावर जाऊन मतदान करावे, ९ जुलैपर्यंत मतदान करता येणार असून निकाल ऑक्टोबर महिन्यात जाहीर होणार असल्याचेही वारे यांनी सांगितले. बक्षीस मिळवणे हा उद्देश नाहीबक्षीस मिळवणे हा उद्देश नव्हता, तर सरकारी शाळांमध्येही जागतिक दर्जाचे शिक्षण मिळू शकते, हे दाखवण्यासाठी आम्ही या स्पर्धेत भाग घेतला. जालिंदरनगर शाळा ‘लोकसहभागातून शाळा विकास’ या श्रेणीत सहभागी झाली होती. विद्यार्थ्यांना फ्रेंच, जर्मनसारख्या परदेशी भाषा शिकवल्या गेल्या. एक हजार पर्यंतच्या पाठांचे सहज म्हणणे, इस्त्रोसोबतचा शैक्षणिक करार, उपग्रह निर्मितीचा अभ्यास या सर्व उपक्रमांनी शाळेचा दर्जा वेगळ्याच उंचीवर पोहोचवला असल्याचेही मुख्याध्यापक दत्तात्रय वारे म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSchoolशाळा