शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

पोटगीसाठी लपवतात उत्पन्नाची माहिती;आर्थिक सक्षम तरी पतीला लुबाडण्यासाठी घातला घाट

By नम्रता फडणीस | Updated: June 28, 2025 15:25 IST

- न्यायालयाने पत्नीला फटकारत पोटगीचा अर्ज नाकारला. हे एक प्रातिनिधिक उदाहरण! मात्र, असे पोटगीचे अर्ज न्यायालयाकडून नामंजूर होत असल्याची काही प्रकरणे समोर आली आहेत.

पुणे : पत्नी उच्च शिक्षित असून, ती स्वतः दीड लाख रुपये कमावते. तरीही न्यायालयात पोटगीसाठी अर्ज करून पती नोकरीविना असताना, तिने स्वतः आपल्या पगारातून आणि बचतीतून घराचे आणि गाडीचे हप्ते भरले. मात्र, आता पती त्यांच्या डिजिटल मार्केटिंग कंपनीतून दरमहा ५ लाख रुपये निव्वळ नफा आणि केरळमधील रबर शेतीतून वर्षाला १० लाख रुपये नफा कमावत असून, त्यांची एकूण वार्षिक अंदाजित कमाई ७० लाख रुपये आहे.

त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे दरमहा १ लाख रुपये पोटगी देण्यात यावी. अशी मागणी पत्नीने केली. न्यायालयाने पत्नीला फटकारत पोटगीचा अर्ज नाकारला. हे एक प्रातिनिधिक उदाहरण! मात्र, असे पोटगीचे अर्ज न्यायालयाकडून नामंजूर होत असल्याची काही प्रकरणे समोर आली आहेत.

पोटगी हा महिलांचा अधिकार असला तरी ज्या महिला स्वतः उच्चशिक्षित व चांगल्या पगारावर नोकरी करत आहेत. त्यांच्याकडून न्यायालयाला सादर कराव्या लागणाऱ्या प्रतिज्ञापत्रात स्वतः:च्या उत्पन्नाची माहिती लपविणे, खोटी माहिती देणे याद्वारे पतीकडून पोटगी उकळण्याचे धक्कादायक वास्तव पाहायला मिळत असून, न्यायालयाकडून अशा महिलांचे पोटगीचे अर्ज फेटाळले जात आहेत.

जर पत्नीचे उत्पन्न पतीपेक्षा खूपच कमी असेल अथवा ती गृहिणी असेल आणि ती तिच्या पूर्वीच्या जीवनशैलीप्रमाणे जगू शकत नसेल, तर तिला पोटगी मिळू शकते. परस्पर संमती, तसेच एकतर्फी घटस्फोट घेऊन विभक्त झालेल्या तब्बल ७० ते ८० टक्के महिला या अशाप्रकारे पोटगीवर अवलंबून असतात. यात घटस्फोटानंतर पतीपासून विभक्त झाल्यावर जर महिला नोकरी करत असूनही एकलपणे मुलांचा सांभाळ करणार असतील तर त्यांना मुलांसाठी पोटगी मागण्याचा अधिकार कायदा देतो. हे जरी खरे असले तरी न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केल्यानंतर उच्च शिक्षित व चांगल्या पगाराची नोकरी करणाऱ्या काही महिला केवळ पतीला आर्थिकदृष्ट्या लुबाडण्यासाठी पोटगीची मागणी करताना दिसत आहेत. मात्र, पोटगी योग्य व पारदर्शकतेच्या आधारावर दिली पाहिजे, असे वकिलांचे म्हणणे आहे.

पोटगी मिळण्यासाठी कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या जातात?

-जर पत्नीचे उत्पन्न तिच्या पतीपेक्षा खूपच कमी असेल आणि ती तिच्या पूर्वीच्या जीवनशैलीप्रमाणे जगू शकत नसेल

- जर विवाह दीर्घकाळ टिकलेला असेल, तर न्यायालय घटस्फोटानंतरही पत्नीला पूर्वीच्या जीवनशैलीप्रमाणे जगता यावे यासाठी प्रयत्न करते.

- पतीची आर्थिक स्थिती चांगली असल्यास आणि पत्नीला आर्थिक आधार देण्यास सक्षम असल्यास

-घटस्फोटाचे कारण काय आहे यावरही पोटगी अवलंबून असते.

- पोटगीची रक्कम निश्चित करताना न्यायालय पती-पत्नीचे उत्पन्न, जीवनशैली, मुलांची जबाबदारी इत्यादी बाबींचा विचार करतात.

पोटगी योग्य व पारदर्शकतेच्या आधारावर दिली पाहिजे. न्यायालयाने अर्ज फेटाळल्यास, योग्यपणे आर्थिक मदतीला न्याय मिळेल आणि महिलांचा दिशाभूल करण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी ठरणार नाही. न्यायालयाने पोटगीची रक्कम ठरवण्यासाठी पती-पत्नीचे शिक्षण आणि आर्थिक दुर्बलता-सबलता लक्षात घेणे गरजेचे आहे. - ॲड. अजिंक्य पु. साळुंके 

आज पती-पत्नी दोघांमध्ये अहंकार वाढला आहे. तरुणींमध्ये फक्त जीवनशैली, पैशाचे आकर्षण वाढले आहे. त्यांना अशा पद्धतीची नाती हवी आहेत की जिथे त्या जीवन एन्जॉय करू शकतील आणि म्हणतील तेव्हा त्या नात्यातून बाहेर पडू शकतील. त्यामुळे पतीकडून पैसे घेण्यापुरते हे प्रकरण ताणायचे. त्यानंतर नात्याचा शेवट करायचा. पैशाने सुविधा मिळतील; पण मुलांना आई-वडील मिळणार नाहीत. हेच महिलांना कळत नाही. - ॲड. नीता भवर 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCourtन्यायालय