शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सेवादूत उपक्रम बंद होणार? राज्य सरकारचा घरपोच दाखले देण्याचा निर्णय

By नितीन चौधरी | Updated: April 3, 2025 16:06 IST

जिल्हा प्रशासनाचा निर्णय मागे घ्यावा लागणार 

पुणे जिल्ह्यात आपले सरकार सेवा केंद्र महा-ई-सेवा केंद्र सेतू केंद्र याद्वारे देण्यात येणाऱ्या दाखल्यांची घरपोच सेवा देण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या सेवादूत उपक्रमाला सुरुवात होण्यापूर्वीच बंद करावे लागणार आहे. राज्य सरकारनेही याच धरतीवर आपले सरकार सेवा केंद्रातून शंभर रुपयात घरपोच दाखला ही सेवा सुरू केली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची सेवा दूत हा उपक्रम बारगळणार आहे. हा उपक्रम सेवा केंद्रांमधील खाजगी कर्मचाऱ्यांमार्फत राबविला जाणार होता. राज्य सरकारचा हा उपक्रम अधिकृत कर्मचाऱ्यांकडूनच राबविला जाणार असल्याने त्याविषयी पारदर्शकता असेल असे बोलले जात आहे.

या संदर्भात राज्य सरकारने शासन निर्णय जाहीर केला असून सेवा केंद्रांमधील दाखल्यांची पूर्तता करण्यासाठी आता घरपोच सेवा देखील देण्याचे यात नमूद करण्यात आले आहे यासाठी नागरिकांना शंभर रुपये मोजावे लागणार असून त्यातील ८० टक्के सेवा केंद्र व जिल्हा समितीकडे जाणार असून २० टक्के रक्कम राज्य सरकारच्या तिजोरीत जमा होणार आहे.

जिल्ह्यात आपले सरकार सेवा केंद्राची संख्या ही २०११ च्या जनजगणनेनुसार होती. राज्य सरकारने आपले सरकार सेवा केंद्र स्थापन कऱण्याचे निकष सहा वर्षापूर्वी निश्चित केले होते. त्यामुळे त्यावेळची आणि आताच्या लोकसंख्येत फार बदल झाला आहे. त्यामुळे आपले सरकार सेवा केद्रांच्या संख्येत वाढ कऱण्याची आवश्यकता सरकारने व्यक्त केली आहे. त्यामुळे आता आपले सरकार सेवा केंद्राच्या संख्येत वाढ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.यासंदर्भात जिल्हा परिषदेकडून ग्रामंपचायतींची नावे, तसेच लोकसंख्या आणि पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकेकडून त्यांच्याकडील वॉर्डांची लोकसंख्येची माहिती मागविण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात १ हजार ८९० आपले सरकार सेवा केंद्रांना मान्यता आहे. त्यापैकी एक हजारांहून अधिक सेवा केंद्रे कार्यरत आहेत. इतर केंद्रे बंद अवस्थेत किंवा कार्यरत नाहीत.

या शासन निर्णय आताच सेवा केंद्रांमधील सेवा केंद्रांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या गावांमध्ये लोकसंख्या ५ हजारपेक्षा जास्त आहे अशा ठिकाणी ही संख्या एकवरून ४ करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई वगळून इतर महापालिका व नगरपरिषदेसाठी दहा हजार लोकसंख्येसाठी दोन केंद्रे तसेच प्रत्येक नगरपंचायत क्षेत्रात किमान दोन आपले सरकार सेवा केंद्रे स्थापन कऱण्यात येईल. परंतु, पाच हजारापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या नगर पंचायतीत किमान चार केंद्रे स्थापन करण्यात येतील. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडGovernmentसरकारMahayutiमहायुती