जेजुरी : चैत्र शुद्ध प्रतिपदा, हिंदू नववर्ष, गुढीपाडवा निमित्त महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी गडावर गुढी उभारून नववर्ष साजरे करण्यात आले. गुढी पाडव्यानिमित्त जेजुरी गडावरील खंडोबा मंदिरात पहाटेची महापूजा संपन्न झालेनंतर, मुख्य गाभाऱ्यामध्ये पाखळणी (स्वच्छता) करण्यात आली.
महापूजा अभिषेक, देवाला नवे कपडे, सोन्याचे दागिने, साखरेची गाठी घालण्यात आली. श्री मार्तंड देव संस्थानच्या वतीने श्री खंडोबा मंदिर मुख्य गाभारा व परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली.
खंडोबा मंदिरासमोरील बगडावर विश्वस्त मंडळाच्या हस्ते गुढी उभारण्यात आली. यावेळी देवसंस्थानचे अध्यक्ष मंगेश घोणे, विश्वस्त ॲड. विश्वास पानसे, डॉ. राजेंद्र खेडेकर, ॲड. पांडुरंग थोरवे, जयमल्हार चंपाषष्ठी मंडळाचे प्रमुख गणेश आगलावे व अधिकारी कर्मचारी वर्ग, पुजारी सेवक वर्ग उपस्थित होते.
Web Summary : Jejuri fort celebrated the Hindu New Year with Gudhi hoisting at Khandoba temple. Special prayers, decorations, and rituals marked the auspicious occasion. Devotees and temple authorities participated.
Web Summary : खंडोबा मंदिर, जेजुरी किले में गुड़ी फहराकर हिंदू नव वर्ष मनाया गया। विशेष प्रार्थना, सजावट और अनुष्ठानों के साथ शुभ अवसर मनाया गया। भक्त और मंदिर प्राधिकरण शामिल हुए।