शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Video : माळशेज घाटात मुसळधार पावसामुळे काळू नदीला पूर; ५० पर्यटकांची थरारक सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 14:51 IST

पर्यटनासाठी धबधब्याच्या परिसरात गेलेले पर्यटक अचानक आलेल्या पुरामुळे अडकल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिक आणि पोलीस प्रशासनाने तत्काळ मदतीस धाव घेतली.

पुणेमागील काही दिवसांपासून माळशेज घाट परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पर्यटकांच्या आवडीच्या काळू नदीला मोठा पूर आला आहे. या पूरपरस्थितीत शनिवारी सायंकाळी काळू धबधबा परिसरात अडकलेल्या सुमारे ४० ते ५० पर्यटकांची थरारक सुटका करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ चर्चेत आला आहे.अधिकच्या माहीतीनुसार, पर्यटनासाठी धबधब्याच्या परिसरात गेलेले पर्यटक अचानक आलेल्या पुरामुळे अडकल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिक आणि पोलीस प्रशासनाने तत्काळ मदतीस धाव घेतली. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे अडलेल्या पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, बचाव पथकाच्या सतर्कतेने आणि संयमाने एकामागोमाग एक सर्व पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.ही संपूर्ण बचावमोहीम अत्यंत कठीण परिस्थितीत पार पडली. धबधब्याच्या परिसरात चिखल, निसरडी जमीन आणि सतत कोसळणारा पाऊस यामुळे अडथळे निर्माण होत होते. तरीदेखील पोलिस, स्थानिक नागरिक आणि आपत्कालीन यंत्रणेने मोठ्या धैर्याने सर्व पर्यटकांची सुखरूप सुटका केली.

या थरारक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, पावसाळ्यात धबधब्यांच्या ठिकाणी जाताना अधिक काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. माळशेज घाट परिसरातील निसर्गरम्य ठिकाणे जितकी आकर्षक आहेत, तितकीच पावसाळ्यात धोकादायकही ठरू शकतात, हे पुन्हा एकदा या घटनेतून स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड