- अंबादास गवंडीपुणे : आतापर्यंत पाच वेळा मुदतवाढ देऊनही शहरातील २६ लाख ३३ हजार वाहनांपैकी १९ लाख १५ हजारांहून अधिक वाहने एचएसआरपी (उच्च सुरक्षा पाटीविना) धावत आहेत. आता ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. एकूण वाहनांच्या ६५ टक्क्यांहून अधिक वाहने एचएसआरपी नंबरविना फिरत आहेत. वाहनधारकांच्या दुर्लक्षामुळे एचएसआरपी नंबर प्लेट लावण्याचा वेग मंदावला असून, ३० नोव्हेंबरनंतर एचएसआरपीविना धावणाऱ्या वाहनांवर १ हजार रुपये दंड आकारण्यात येईल, असा इशारा परिवहन शाखेकडून देण्यात आला होता; परंतु वाहनांची संख्या पाहता आणखी मुदतवाढ मिळणार का? हे पाहावे लागणार आहे.
अपघात किंवा गुन्ह्यातील सहभागी होणाऱ्या वाहने सहजपणे पकडता यावीत, प्रत्येकाचे वाहन सुरक्षित राहावे म्हणून सर्व वाहनांना ‘एचएसआरपी’ नंबर प्लेटचे बंधन घालण्यात आले. १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांसाठी ही अट आहे. अनेक गुन्हे व अपघातातील वाहने या नंबर प्लेटमुळे सहजपणे शोधता येणे शक्य आहे. दरम्यान, आतापर्यंत पुण्यातील सात लाख १७ वाहनधारकांनी ती नंबरप्लेट बसवून घेतली आहे; पण अनेकांनी मुदतवाढ देऊनही त्याकडे पाठ फिरविली आहे. मध्यंतरी फिटमेंट सेंटर कमी असल्याचे ओरड होत होती; परंतु आरटीओच्या सूचनेनुसार संबंधित कंपनीकडून फिटमेंट सेंटर वाढविण्यात आले. तरीही नंबरप्लेट लावण्याकडे दुर्लक्ष होत आहे. आता राहिलेल्या वाहनधारकांसाठी पुन्हा डिसेंबर २०२५ किंवा जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ द्यावीच लागणार आहे. कारण, नंबरप्लेट बसविलेली वाहने एकूण वाहनांच्या ३५ ते ४० टक्केसुद्धा नाहीत. सध्या मुदत संपायला आता केवळ २४ दिवस बाकी आहेत. या कमी कालावधीत जवळपास १९ लाख वाहनांना नंबर प्लेट कशी लावणार? नागरिकांचाही अल्प प्रतिसादामुळे वेग मंदावला आहे.
फॅन्सी नंबर इतके आहे दंड?
अनेक वाहनचालक त्यांच्या वाहनाच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड करतात. कारवाईत त्या वाहनास पहिल्यावेळी ५०० रुपयांचा दंड होतो. फॅन्सी नंबरप्लेट असल्यास १०० रुपये दंड होतो. काही वाहनचालक तो दंड लगेच भरतात. काहीजण दंड भरतच नाहीत; पण ज्या-ज्या वेळी त्या वाहनावर पुन्हा कारवाई होते, तेव्हा त्यास तिप्पट म्हणजे १५०० रुपयांचा दंड आपोआप ऑनलाइन पडतो. सहा महिन्यांनंतर मग पूर्वीप्रमाणे पहिल्यांदा ५०० रुपये दंड पडतो, अशी दंडाची प्रक्रिया आहे.नऊ लाखांहून अधिक वाहनधारकांनी केला अर्ज पुणे प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयांतर्गत २६ लाख ३३ हजार वाहनांना ‘एचएसआरपी’ नंबर प्लेट लावणे आवश्यक आहे. मात्र, आतापर्यंत पाच वेळा मुदतवाढ देऊनही केवळ ९ लाख २५ वाहनधारकांनी नंबर प्लेटसाठी अर्ज केला आहे. यातील ७ लाख १७ हजार वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट लावण्यात आली आहे. एकूण वाहनांच्या सरासरी ३५ टक्केच वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट बसवून झाल्या आहेत.
‘एचएसआरपी’ अशी आहे आकडेवारी :
नंबरप्लेट अपेक्षित वाहने : २६ लाख ३३ हजार
‘एचएसआरपी’ न बसविलेली वाहने : १९ लाख १५ हजार
‘एचएसआरपी’ नंबर प्लेट अर्ज केलेल्या वाहन संख्या : ९ लाख २२ हजार
‘एचएसआरपी’ नंबर प्लेट बसविलेली वाहने : ७ लाख १७ हजार
Web Summary : Pune faces HSRP compliance lag. 65% vehicles lack the mandatory plates. Deadline looms; ₹1000 fine possible. Extension likely due low compliance.
Web Summary : पुणे में एचएसआरपी का अनुपालन धीमा है। 65% वाहनों पर अनिवार्य प्लेटें नहीं हैं। समय सीमा नजदीक है; ₹1000 का जुर्माना संभव है। कम अनुपालन के कारण विस्तार की संभावना है।