शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शिरूर तालुक्यातील बिबट्याचा थरार थांबेना; ७२ तासांतच दुचाकीस्वारांवर झेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 16:42 IST

- दिवसाढवळ्या बिबट्याची झडप, नागरिक भयभीत : वन विभागाच्या प्रयत्नांना खो, गावागावांत बिबट्याचा मुक्त संचार बेफाम

- सचिन चव्हाणमलठण : शिरूर तालुक्यातील बेट भागात बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. मागील दहा दिवसांत दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतरही वन विभागाच्या प्रयत्नांना यश येत असले तरी बिबट्यांचा मुक्त संचार कायम आहे. शुक्रवारी बारा तासांत तीन बिबट्यांना पिंजऱ्यात बंद करण्यात यश आले असले तरी ७२ तास उलटले नाहीत तोच शनिवारी दुपारी दुचाकीस्वारांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये आणखी भीतीचे वातावरण पसरले असून, वन विभागाकडे अधिक पिंजरे लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

शिरूर तालुक्यातील पिंपरखेड आणि जांबुत परिसरात मागील दहा दिवसांपूर्वी दोन दुर्दैवी घटना घडल्या होत्या. पिंपरखेड येथे शिवन्या बोंबे या चिमुरडीचा आणि जांबुत येथे ७० वर्षांच्या भागुबाई जाधव यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. या घटनांनी खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांच्या तक्रारींनंतर वन विभागाने बिबट्यांना नियंत्रित करण्यासाठी पिंजरे लावण्याची मोहीम हाती घेतली. या मोहिमेअंतर्गत शुक्रवार, दि. २४ रोजी बारा तासांत तीन बिबट्यांना यशस्वीपणे जेरबंद करण्यात आले. हे बिबटे माणिक डोह येथील बिबट्या निवारण केंद्रात हलविण्यात आले आहेत.

शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता शेतकरी कचर महादू बोंबे यांच्या उसाच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात साधारण ६ ते ७ वर्षे वयाचा पूर्ण वाढलेला नर बिबट्या अडकला. त्याच वेळी पारगाव रोड परिसरात शेतकरी नरेश सोनवणे यांच्या घराजवळील पिंजऱ्यात ४ वर्षे वयाचा बिबट्या आणि दाभाडे मळा परिसरात गजानन गिरी गोसावी यांच्या शेतात ५ वर्षे वयाचा पूर्ण वाढलेला मादी बिबट्या जेरबंद झाला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बिबट्यांची तपासणी करून त्यांना सुरक्षितपणे केंद्रात नेले. मात्र, या परिसरात बिबट्यांची संख्या २०० ते २५० इतकी असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे पिंजऱ्यांची संख्या अतिशय कमी असल्याची टीका होत आहे. स्थानिक शेतकरी आणि नागरिकांच्या मते, बिबट्यांच्या संख्येच्या तुलनेत वन विभागाचे प्रयत्न अपुरे आहेत.

दरम्यान, शनिवार, दि. २५ रोजी दुपारी १ वाजता आणखी एक धक्कादायक घटना घडली. विशाल जुन्नर पाटपेडीचे शाखा व्यवस्थापक गणेश गोसावी आणि लेखनिक कैलास बोरचटे हे दुचाकीवरून कामानिमित्त जात असताना जांबुत येथील एचपी पंपाजवळील ओढ्यात डबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर झेप घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोसावी यांनी प्रसंगावधान राखून दुचाकीचा वेग वाढवला आणि जोरदार आरडाओरडा केला. यामुळे बिबट्या शेजारच्या उसाच्या शेतात पळून गेला. ‘‘जर आम्ही वेळीच लक्ष दिले नसते तर ही घटना मोठ्या जीवितहानीला कारणीभूत ठरली असती,’’ असे घाबरलेल्या असलेल्या गोसावी आणि बोरचटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, दिवसाढवळ्या होणाऱ्या हल्ल्यांमुळे नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.

अधिकाधिक पिंजरे लावण्याची आणि परिसरात गस्त वाढवण्याची मागणी 

बेट भागात अन्न आणि पाण्याच्या शोधात बिबट्यांचा मुक्त संचार वाढला आहे. उसाच्या शेतांमध्ये आणि गावांच्या जवळपास ते फिरत असल्याने शेतकरी, मजूर आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी धोका निर्माण झाला आहे. मागील दहा दिवसांत बिबट्यांच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला असून, तिघा जनावरांवरही जीवघेणे हल्ले झाले आहेत. स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ‘‘आणखी किती घटना घडल्याशिवाय वन विभाग गांभीर्याने कार्यवाही करणार?’’ असा सवाल उपस्थित होत आहे. नागरिकांनी वन विभागाकडे अधिकाधिक पिंजरे लावण्याची आणि परिसरात गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.

गांभीर्य नसल्यास हा ‘खेळ’ आणखी जीवघेणा ठरू शकतो 

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बिबट्यांना नियंत्रित करण्यासाठी मोहीम सुरू असून, आणखी पिंजरे लावण्यात येत आहेत. मात्र, नागरिकांच्या मते, उपाययोजनांबाबत गांभीर्य नसल्यास हा ‘खेळ’ आणखी जीवघेणा ठरू शकतो. शिरूर तालुक्यातील या परिसरात मानव-वन्यजीव संघर्ष वाढत असल्याने दीर्घकालीन उपाययोजनांची गरज आहे. वन विभागाने स्थानिकांशी समन्वय साधून बिबट्यांच्या वास्तव्याचे निरीक्षण वाढवावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

मागील दहा दिवसांत घडलेल्या घटना :बिबट्याच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू (शिवन्या बोंबे आणि भागुबाई जाधव). तिघा जनावरांवर जीवघेणे हल्ले. 

वन विभागाला आवाहन :उपाययोजनांबाबत गांभीर्य न दाखवल्यास नागरिकांसाठी आणखी धोके वाढू शकतात. अधिक पिंजरे आणि गस्त आवश्यक

English
हिंदी सारांश
Web Title : Leopard terror continues in Shirur; attacks motorcyclists within 72 hours.

Web Summary : Leopard attacks persist in Shirur, with one recent attempt on motorcyclists. Despite trapping three leopards, fear grips villagers. Two deaths occurred in the last ten days. Locals demand increased cages and patrols.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रleopardबिबट्या