- जयवंत गंधालेहडपसर : सुविधांची वानवा, औषधांचा तुटवडा, अस्वच्छतेचे साम्राज्य अन् परिसरात दारूच्या बाटल्यांचा खच हे दृश्य आहे हडपसर येथील पुणे महानगरपालिकेच्या अण्णासाहेब मगर आरोग्य केंद्राचे. यामुळे या आरोग्य केंद्राचेच आरोग्य बिघडले असल्याचे दिसते.सुमारे १० लाख लोकसंख्या असलेल्या हडपसरला केवळ एकच आरोग्य केंद्र आहे. गेल्या ६८ वर्षांत केवळ एकच रुग्णालय हडपसरमध्ये बांधण्यात आले आहे. पण त्यात मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी पालिकेने ना फंड दिला ना येथील दुरवस्था पाहण्यासाठी वेळ दिला. विशेष म्हणजे या आरोग्य केंद्रामध्ये दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसतो. त्यामुळे या आरोग्य केंद्राला दारूचा अड्डा बनवले आहे. याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, परंतु त्यांचा उपयोग होत नाही. ते बंद अवस्थेत आहेत. सुरक्षारक्षक करतात काय? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.प्रसूती केंद्रही झाले बंदअशा परिस्थितीत महिला रुग्णांच्या सुरक्षिततेवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याठिकाणी काही वर्षांपूर्वी प्रसूती केंद्र चालू होते. ते दोनदा बंद झाले आणि पुन्हा चालू केले. प्रसूती केंद्रामध्ये येणाऱ्या स्त्रियांच्या सुरक्षिततेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण होते.क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सोयरसूतक नाहीस्थानिक हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील सहायक आयुक्त बाळासाहेब ढवळे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी सांगितले की, हा विषय हडपसरच्या क्षेत्रीय संबंधित नसून आरोग्य विभाग आणि सुरक्षा विभाग यांच्याकडे येतो.
हडपसर येथील आरोग्य केंद्रामध्ये दारूच्या बाटल्या पडल्या असून, तेथे सुरक्षा कडक नसल्याची तक्रार आली होती. त्यानुसार तेथील सुरक्षारक्षक आणि आरोग्य विभाग यांना मेमो दिलेले आहेत. शिवाय सुरक्षा व्यवस्था चोख ठेवावी, असा आदेश देण्यात आला आहे. - डॉ. झेंडे, उपायुक्त, आरोग्य विभाग, पुणे महानगरपालिका