शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

डांबर खरेदीत घोटाळा : ज्या‌ खात्यावर घोटाळ्याचे आरोप; त्याच खात्याचा प्रमुख करणार चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 14:54 IST

महापालिका आयुक्तांच्या निर्णयाने अनेकांना आश्चर्य

-हिरा सरवदेपुणे : महापालिकेला डांबर पुरविणाऱ्या ठेकेदाराने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमताने महापालिकेची लूट केल्याचा आरोप झाल्यानंतर महापालिका आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, ज्या पथविभागावर आरोप झाले, त्याच पथविभागाच्या प्रमुखावर चौकशी करण्याची जबाबदारी सोपवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, घोटाळ्याच्या आरोपानंतर महापालिका आयुक्तांनी डांबर खरेदीच्या निविदा थांबवून पुढील तीन महिने थेट कंपनीकडूनच डांबर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.महापालिकेला डांबर पुरवठा करणाऱ्या ठेकेदार कंपनीने पथ विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने महापालिकेची कोट्यवधींची फसवणूक केल्याचा आरोप स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अॅड. नीलेश निकम यांनी केला होता. 

या ठेकेदाराने महापालिकेला डांबर पुरवठा केल्याची बिले दाखवून तेच डांबर पुणे, सोलापूर आणि सातारा जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागासाठीच्या कामांसाठी पाठविले. एकाच मालाची दोन्हीकडे विक्री करून दोन्ही ठिकाणांहून बिले घेतल्याचा आरोप करत टैंकर क्रमांक, दिनांक आणि वेळेसह महापालिका आयुक्तांकडे पुरावे दिले होते. तसेच या गैरव्यवहारामध्ये महापालिकेला डांबर मिळाले नसताना त्याचे पैसे अदा केल्याचे अॅड. निकम यांनी आपल्या आरोपात म्हटले होते.पूर्वी महापालिका थेट रिफायनरी कंपनीकडून डांबर खरेदी करत होती. मात्र, मागील तीन वर्षापासून ठेकेदाराच्या मार्फत डांबर खरेदी केले जात आहे. यामुळे महापालिकेला दहा ते बारा कोटी रुपये अधिक द्यावे लागत आहेत, असाही आरोप त्यांनी केला होता.दरम्यान, महापालिकेच्या पथ विभागाने पुन्हा तीन वर्षांसाठी डांबर पुरवठ्याची निविदा मागविली होती. पुन्हा पूर्वीच्या एकाच कंपनीची निविदा आली आहे. संबंधित ठेकेदाराबद्दल तक्रार केली असतानाही फसवणूक करणाऱ्या कंपनीलाच काम देण्याचा घाट पथ विभागाकडून घातला जात असल्याचा आरोप करत अॅड. निकम यांनी निविदा रद्द करण्याची मागणी केली होती. तसेच मागील खरेदीची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी. महापालिकेचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी थेट कंपन्यांकडून खरेदी करावी, अशी मागणी आयुक्तांकडे केली.

यावर आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी याप्रकरणी समिती स्थापन करून चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार पथ विभागाचे प्रमुख अनिरूद्ध पावसकर यांना चौकशीचे आदेश दिले.

ज्या विभागावर आरोप त्याच्या प्रमुखांकडून चौकशीनिविदा प्रक्रिया थांबविण्यात आली असून पुढील तीन महिने थेट कंपनीकडूनच डांबर खरेदी करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, ज्या विभागावर आरोप झाला आहे, त्याच विभागाच्या प्रमुखावर चौकशी करण्याची जबाबदारी सोपवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे डांबर घोटाळ्याची चौकशी निष्पक्ष होईल का याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे.

लवकरच प्रकरणाचा दिला जाईल अहवालडांबर खरेदी प्रकरणाचा चौकशी अहवाल लवकरच महापालिका आयुक्तांकडे सादर केला जाईल, त्यानंतर आयुक्तांकडून पुढील कार्यवाही केली जाईल तूर्तास अहवाल सादर करण्याची कार्यवाही सुरु आहे. अशी माहिती पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMuncipal Corporationनगर पालिकाcivic issueनागरी समस्याCorruptionभ्रष्टाचार