शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

राज्याची तिजोरी लुटून सत्तेवर आलेले सरकार; शशिकांत शिंदेंनी सरकारवर केले आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 21:23 IST

सत्तेच्या अडीच वर्षात या ट्रिपल इंजिन सरकारने राज्याला लुटले. तेच पैसे वाटून ते सत्तेवर आले. साडेआठ लाख कोटी रूपयांचे कर्ज महाराष्ट्रावर आहे. कंत्राटदारांचे सरकारने ८९ हजार कोटी रूपये देणे आहे.

पुणे: सत्तेच्या अडीच वर्षात राज्याची तिजोरी लुटून हे सरकार सत्तेवर आले आहे. सरकार स्थापन होताच ८ महिन्यात ५७ हजार कोटी रूपयांच्या पुरवणी मागण्या करतात, फक्त ८ महिन्यातच मंत्री आणि मंत्र्यांची खाती बदलावी लागतात हे राज्य सरकारचे अपयशच आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी केली. पक्षाचे राज्य सरचिटणीस रोहित पवार यांनी यावेळी आमची लढाई तुम्ही लढलात आता तुमची लढाई आम्ही लढू असे कार्यकर्त्यांना सांगितले.प्रदेशाध्यक्षपदी व सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल पक्षाच्या शहर शाखेच्या वतीने शिंदे व पवार यांचा सत्कार करण्यात आला. निवड झाल्यानंतर ते प्रथमच पुण्यात आले म्हणून पक्षाच्या कार्यालयात त्यांचे ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. शिंदे यांनी सत्काराला उत्तर देताना राज्य सरकारवर निशाणा साधला. रोहित पवार यांनीही सरकारवर टीका केली तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काय करायचे याविषयी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.ते म्हणाले, सत्तेच्या अडीच वर्षात या ट्रिपल इंजिन सरकारने राज्याला लुटले. तेच पैसे वाटून ते सत्तेवर आले. साडेआठ लाख कोटी रूपयांचे कर्ज महाराष्ट्रावर आहे. कंत्राटदारांचे सरकारने ८९ हजार कोटी रूपये देणे आहे. यांचे मंत्री शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले जात असताना विधानसभागृहात रम्मी खेळत बसतात. बील थकले म्हणून तरूण कंत्राटदार आत्महत्या करतो. तरीही सरकारला त्याच्याबद्दल सहानुभूती वाटत नाही. टोलवाटोलवी करतात. या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकारच नाही.रोहित पवार म्हणाले, आमची खासदारकी, आमदारकीची लढाई तुम्ही प्राणपणाला लावून लढलात, आता तुमची स्थानिक स्वराज्य संस्थांची उमेदवारी आम्ही तशीच लढू. सर्व प्रकारची ताकद देऊ. सामाजिक कामांसाठी लढताना कोणीही त्रास देत असेल तर तिथे फक्त २४ तासांमध्ये पक्षाचा किमान एक नेता उपस्थित राहिल अशी रचना करणार आहोत. प्रामाणिक, तरूण कार्यकर्त्यांना नक्की उमेदवारी दिली जाईल. मतदान यंत्र मॅनेज करण्याचे नवे राजकारण यांनी सुरू केले आहे. त्यामुळे ही लढाई बूथवर आपण बारिक लक्ष ठेवण्यापासूनची आहे. त्याबाबतचे प्रशिक्षण कार्यकर्त्यांना दिले जाणार आहे.शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी प्रास्तविक केले. राज्य प्रवक्ते अंकूश काकडे यांनी स्वागत केले. आमदार बापू पठारे, माजी आमदार जयदेव काकडे यांचीही भाषणे झाली. पक्षाच्या विविध आघाड्यांच्या वतीने शिंदे व पवार यांचा सत्कार करण्यात आला.शहरात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची महापालिका निवडणुकीसाठी सर्व सज्जता आहे. चांगली कामगिरी होणार याचा विश्वासच नव्हे तर खात्री आहे, मात्र महाविकास आघाडी कि स्वतंत्र की आणखी काही याचा निर्णय प्रदेशकडून लवकर व्हावा. उशिरा निर्णय झाला की त्याचा परिमाण मतदारांवर व मग विजयावरही होतो. त्यामुळे पक्षाने याबाबतीत आघाडीतील अन्य पक्षांबरोबर लगेचच चर्चा सुरू करावी. त्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी शहराध्यक्ष जगताप यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSharad Pawarशरद पवार