शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
3
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
4
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
5
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य तिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
6
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
7
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
8
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
9
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
10
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
12
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
13
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
14
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
15
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
16
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
17
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
18
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
19
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
20
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी

अवैध क्रशर उद्योग, खाणकामावर कारवाई करा;जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे अधिकाऱ्यांना आदेश

By नितीन चौधरी | Updated: March 13, 2025 09:31 IST

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी महसूल यंत्रणेला दिले, अन्यथा मलाच कारवाई करावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

पुणे : जिल्ह्यातील अवैध क्रशर उद्योग आणि खाणकामामुळे महसूल विभागाची प्रतिमा मलिन होत आहे. हे तातडीने थांबवावे. हे अवैध क्रशर उद्योग येत्या पंधरा दिवसात तसेच अवैध खाणकाम दोन महिन्यांत बंद करावेत, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी महसूल यंत्रणेला दिले, अन्यथा मलाच कारवाई करावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांसाठी आयोजित महसूल कार्यशाळेत ते बोलत होते. गेल्या काही महिन्यात अवैध उत्खननावरून जिल्ह्याच्या विविध भागात कारवाई केली आहे. तसेच अवैध क्रशर उद्योगामुळे नागरिकांच्या तक्रारींमध्ये देखील वाढ होत आहे. त्यामुळे महसूल विभागाची प्रतिमा मलिन होत असून अशा अवैध क्रशर आणि उत्खननावर तातडीने कारवाई करावी, असा आदेश डुडी यांनी दिला.या सर्व अवैध बाबी १०० टक्के बंद करा, अन्यथा मलाच कारवाई करावी लागेल. ते तुमच्यासाठी योग्य नसेल. त्यामुळे प्रत्येकाने आपापले काम चोखपणे करावे, असा इशाराही डुडी यांनी यावेळी दिला. कर्मचाऱ्यांनी कामात पारदर्शकता वाढवावी असे सांगून सर्वांनी नागरिकांच्या भेटण्याची वेळ निश्चित करावी. त्यासाठी दर सोमवारी व शुक्रवारी कार्यालयातच राहून नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष पुरवाव्यात असे त्यांनी सांगीतले.

आराखड्यात कार्यालयांसाठी निधीची तरतूद केली जाणारजिल्ह्यात नव्याने अडीचशे तलाठी रुजू झाले असून, पुढील काही दिवसांत १०० तलाठी रुजू होणार आहेत. अनेकांना कार्यालय नाही. त्यामुळे अशा ठिकाणच्या कार्यालयांसाठी भाड्याने जागा घेण्याचा प्रस्ताव येत्या दहा दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे द्यावा, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. कर्मचाऱ्यांकडून चांगल्या पद्धतीचे काम अपेक्षित असताना त्यांना संगणक, प्रिंटर या सुविधांसह कार्यालयही उपलब्ध करून दिले जाईल.यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या २०२५-२६ च्या आराखड्यात कार्यालयांसाठी निधीची तरतूद केली आहे. पुढील वर्षभरात या सर्वांना कार्यालय देण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. जिल्हाभरात दरमहिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येणाऱ्या लोकशाही दिवसामध्ये कर्मचारी अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसून राहता ग्रामस्तरावर व तालुका स्तरावर नागरिकांना येणाऱ्या समस्या सोडवण्याचे प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सुचविले.

बदल्यांसाठी कुणीही पदाधिकाऱ्यांना भेटू नयेएप्रिल महिन्यात बदल्यांचे सत्र सुरू होणार असून, जिल्ह्यात आता बदल्यांमध्ये पारदर्शकता दिसून येणार आहे. त्यासाठी कुणीही राजकीय पदाधिकाऱ्यांना भेटू नये अथवा त्यांचे शिफारस पत्र आणू नये. कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सेवा ज्येष्ठतेनुसार व उपलब्ध जागांनुसार बदल्या करण्यात येतील. बदल्यांसाठी माझ्याकडे येण्याची आवश्यकता नाही. कर्मचाऱ्यांना समुपदेशन कक्ष सुरू होईल. पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लागेल. यापुढील महसूल कार्यशाळा २५ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेली आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रcollectorजिल्हाधिकारीpollutionप्रदूषण