शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय सैन्याच्या नव्या पर्वाचा प्रारंभ;‘एनडीए’तून महिला कॅडेट्सची दुसरी तुकडी बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 12:59 IST

त्या ऐतिहासिक क्षणानंतर आता १५ महिला कॅडेट्सची दुसरी बॅच अभिमानाने उत्तीर्ण होत आहे. मुलींची वाटचाल दृढ आणि प्रभावी बनत असल्याचे भावपूर्ण चित्र यंदाच्या दीक्षांत सोहळ्यात पाहायला मिळाले.

पुणे : राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या इतिहासात महिला कॅडेट्सची पहिली तुकडी उत्तीर्ण होणे, हा भारतीय सैन्याच्या नव्या पर्वाचा प्रारंभ मानला गेला. त्या ऐतिहासिक क्षणानंतर आता १५ महिला कॅडेट्सची दुसरी बॅच अभिमानाने उत्तीर्ण होत आहे. मुलींची वाटचाल दृढ आणि प्रभावी बनत असल्याचे भावपूर्ण चित्र यंदाच्या दीक्षांत सोहळ्यात पाहायला मिळाले.

पहिल्या बॅचने एनडीए उत्तीर्ण होताना सैन्यदलात नवे पर्व लिहिल्याचा अभिमान देशाने साजरा केला होता. त्याच परंपरेला पुढे नेत, १४९व्या दीक्षांत समारंभात दुसऱ्या बॅचनेही प्रशिक्षित ‘विद्वान योद्धे’ म्हणून आपली तयारी सिद्ध केली. प्रशिक्षणातील कठोर शिस्त, मैदानी आव्हानांची ओळख, स्क्वॉड्रनमधील परस्पर सहकार्य आणि एकात्मता या सर्व घटकांनी या कॅडेट्सना मानसिक आणि शारीरिक दोन्ही पातळ्यांवर अधिक सक्षम केले. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर यश, आत्मविश्वास आणि अभिमानाची चमक स्पष्ट जाणवत होती.

महिलांची ही दुसरी बॅच उत्तीर्ण होणे म्हणजे, भारतातील सैन्यसेवा अधिक समावेशक आणि व्यापक होत असल्याचा ठोस पुरावा आहे. स्वदेशी क्षमतांवर आधारित आधुनिक संरक्षण तंत्रज्ञानाच्या काळात, या युवा कॅडेट्सची उपस्थिती भारतीय सशस्त्र दलांच्या भविष्यातील ताकदीची ओळख करून देणारी आहे. महिला कॅडेट्सच्या या सातत्यपूर्ण प्रगतीमुळे, देशासाठी सेवा देण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो तरुणींना प्रेरणा मिळत असून, सैन्यातील महिला सहभागाची नवी दारं अधिक प्रभावीपणे उघडली जात आहेत.

मूळची मी उत्तराखंड येथील आहे, तसेच कोणतेही संरक्षण पार्श्वभूमी नाही. एनडीएमध्ये मुलं किंवा मुली यांच्यासाठी प्रशिक्षण सारखं आणि कठीण असत. तीन वर्षांत शिस्त, साहस आणि सत्यनिष्ठेचे खरे मोल शिकवले. कठोर प्रशिक्षण, स्क्वॉड्रनमधील परस्परांवरील अढळ विश्वास आणि इन्स्ट्रक्टरची साथ यामुळे यश प्राप्त झाले.  - अनया बलुनी

English
हिंदी सारांश
Web Title : Second batch of women cadets passes out from NDA.

Web Summary : NDA's second women's batch successfully graduates, marking a new era for women in the Indian military. Their rigorous training underscores the military's increasing inclusivity and strengthens the armed forces for the future. Their achievement inspires countless young women nationwide.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेnda puneएनडीए पुणेWomenमहिला