शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

कुणबी नोंदींच्या शोधाला वेग; मोडी लिपी अभ्यासकांना सुवर्णकाळ

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: September 10, 2025 09:50 IST

देवस्थानाच्या दान नोंदी, वाडवडिलांच्या जमीन खरेदीच्या चिठ्ठया यासाठी जुने पेटारे चाळले जात आहेत. अभिलेखागारांमध्ये गर्दी वाढत आहे.

पिंपरी : मराठा समाजाला आरक्षणासाठी कुणबी म्हणून नोंदी दाखविण्याची अट ठेवली आहे. त्यामुळे जुनी दप्तरे, जमीन अभिलेख, देवस्थान वह्या, महसूल कागदपत्रांमध्ये मोडी लिपीतील पुरावे शोधण्यासाठी या लिपीच्या अभ्यासकांना महत्त्व आले आहे. कालपर्यंत दुर्लक्षित राहिलेली मोडी लिपी कार्यालयाच्या, प्रत्येक तहसील अभिलेखागाराच्या आणि गावोगावी जपलेल्या वह्यांच्या केंद्रस्थानी आली आहे. शासनाने १९५० पूर्वीच्या नोंदी पुराव्यासाठी ग्राह्य धरण्याचे आदेश दिल्यानंतर या शोधमोहिमेने वेग घेतला.

घराघरांत जुनी कागदपत्रे शोधण्याची लगबग सुरू आहे. देवस्थानाच्या दान नोंदी, वाडवडिलांच्या जमीन खरेदीच्या चिठ्ठया यासाठी जुने पेटारे चाळले जात आहेत. अभिलेखागारांमध्ये गर्दी वाढत आहे. कागदपत्रांचे डिजिटायझेशन करण्याची मागणीही जोर धरत आहे. सातशे वर्षांची परंपरा असलेली मोडी लिपी पेशव्यांच्या काळात राजलिपी होती. आजही पुण्यात पाच कोटींहून अधिक कागदपत्रे व्यवस्थित जतन आहेत, पण १९५० नंतर अभ्यासक्रमातून वगळल्याने ही लिपी लुप्त झाली होती. अभ्यासकांसाठी संधीधुळीने झाकलेले दप्तर, फाटके कागद, धूसर शाई आणि गूढ जोडाक्षरे ही डोकेदुखी ठरत असली, तरी मोडी अभ्यासकांसाठी हीच संधी आहे. पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर तालुक्याच्या अभिलेखागारापर्यंत सगळीकडे मोडी तज्ज्ञांची मागणी आहे. मात्र अभ्यासक म्हणतात की, दाखले मिळतीलच याची हमी नाही.

मराठा आरक्षणाच्या घडामोडींमुळे मोडी लिपीला चांगले दिवस आले आहेत, असे म्हणता येईल. या लिपीतील नोंदी शोधण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांनी काम केले आहे. ही लिपी शिकण्यासाठी कार्यशाळेत येणाऱ्यांचीही संख्यावाढ झाली आहे. आतापर्यंत आमच्या विभागातून ४०० ते ५०० जण मोडी लिपी शिकून गेले आहेत. - प्रा. बाबासाहेब दुधभाते, समन्वयक, मोडी लिपी विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.  

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड