भोर : भोर तालुक्यातील दुर्गम भागातील कांबरे बुद्रूक गावातील सई समीर सुकाळे हिने भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पद मिळवत तालुक्याचा मान उंचावला आहे. भाटघर धरणाच्या काठावर असलेल्या या गावातील सईच्या यशामुळे परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सैन्य दलाची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या जोरावर सईने हे यश मिळविले आहे. लहानपणापासून वॉटर स्पोर्ट्सची आवड असलेल्या सईने या क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी लॉंग डिस्टन्स स्वीमिंग प्रकारात तिच्या नावावर लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. तसेच वॉटर पोलो या खेळात राष्ट्रीय स्तरावर दोन सुवर्ण आणि दोन रौप्य पदके तिने मिळविली आहेत.
दि. २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिन संचलनातही तिने उत्कृष्ट कामगिरी केली होती. सैन्य दलातील प्रशिक्षण काळातही सईने दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि तीन कांस्य पदके मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली. उत्कृष्ट कामगिरीबद्दल तिला ‘मिस ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी’ हा मानाचा किताबही प्रदान करण्यात आला. या यशामागे आई सुवर्णा आणि वडील समीर यांचा भक्कम पाठिंबा व प्रोत्साहन असल्याचे सईने सांगितले.
Web Summary : Sai Sukale from Bhore, with a background in water sports, achieved her dream of becoming a Lieutenant in the Indian Army through dedication. She excelled in training, earning accolades and proving her mettle. Her parents provided unwavering support throughout her journey.
Web Summary : भोर की सई सुकाले, जिनकी पृष्ठभूमि वाटर स्पोर्ट्स में है, ने समर्पण के माध्यम से भारतीय सेना में लेफ्टिनेंट बनने का अपना सपना साकार किया। उन्होंने प्रशिक्षण में उत्कृष्ट प्रदर्शन किया, प्रशंसा अर्जित की और अपनी क्षमता साबित की। उनके माता-पिता ने उनकी यात्रा के दौरान अटूट समर्थन दिया।