शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सदानंदाचा येळकोट..! महाशिवरात्रीला जेजुरी गडावर भाविकांची गर्दी; तीनही शिवलिंग दर्शनासाठी खुले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 12:18 IST

“येळकोट येळकोट जय मल्हार”, “सदानंदाचा येळकोट” आणि “हर हर महादेव”च्या जयघोषात भक्तांनी भंडाऱ्याची उधळण करत दर्शन घेतले.

- बी. एम. काळे  जेजुरी (पुणे जिल्हा): महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा मंदिर असलेल्या जेजुरी गड येथे मध्यरात्रीपासूनच भाविकांची प्रचंड गर्दी उसळली. “येळकोट येळकोट जय मल्हार”, “सदानंदाचा येळकोट” आणि “हर हर महादेव”च्या जयघोषात भक्तांनी भंडाऱ्याची उधळण करत दर्शन घेतले.महाशिवरात्रीच्या पुण्यकाळामुळे रविवारी पहाटेच मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही गडावरील कळसातील स्वर्गलोकीचे शिवलिंग, मुख्य गाभाऱ्यातील भुलोकीचे शिवलिंग आणि गाभाऱ्यातील उजव्या बाजूला असलेले पाताळलोकीचे शिवलिंग दर्शनासाठी खुले करण्यात आले. वर्षातून एकदाच महाशिवरात्रीला या तीनही शिवलिंगांचे दर्शन घेण्याची संधी मिळत असल्याने भाविकांनी मोठ्या उत्साहात रांगा लावल्या.  मुख्य मानकरी, उपाध्ये, पुजारी, नित्य वारकरी आणि ग्रामस्थ यांच्या हस्ते विधिवत अभिषेक पूजा करून पहाटेच्या सुमारास तीनही शिवलिंगांचे दर्शन सुरू करण्यात आले. सलग दोन दिवस भाविकांना दर्शनाचा लाभ मिळणार आहे.दरम्यान, मार्तंड देव संस्थान आणि जेजुरी पोलीस ठाणे यांच्या संयुक्त नियोजनामुळे भाविकांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी स्वतंत्र रांगा, सुरक्षा व्यवस्था आणि स्वयंसेवकांची मदत ठेवण्यात आली. संपूर्ण गडकोटावर विद्युत रोषणाई आणि फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली असून काही भाविकांनी फराळाचे वाटपही केले. राज्यभरातून आलेल्या भाविकांनी शांततेत आणि भक्तिभावात दर्शन घेतल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Jejuri Temple Sees Huge Crowd on Mahashivratri; Shivalingas Open.

Web Summary : Jejuri witnessed a massive influx of devotees for Mahashivratri. The temple opened its three Shivalingas for darshan. Devotees chanted and celebrated with fervor.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेJejuriजेजुरी