शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

तिकीट दरवाढीवरून राजकीय नेत्यांचा दुहेरी सूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 15:20 IST

‘पीएमपी प्रवासी भाढेवाढ प्रवाशांसाठी व पीएमपीसाठी तारक की मारक’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते.

पुणे : पीएमपीने दरवाढीचा घेतलेला निर्णय बेकायदेशीर असून, प्रवाशांना झळ बसणार आहे. त्यामुळे भाडेवाढ रद्द करावी. गरज पडल्यास यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा सूर विरोधी पक्षातील नेत्यांनी काढला, पण सत्ताधारी भाजपने पीएमपी सक्षम करण्यासाठी दरवाढ योग्य असल्याचे स्पष्ट केले, शिवाय संस्था टिकविण्यासाठी आवश्यक आहे, असा सूर काढला.

सजग नागरिक मंच आणि पीएमपी प्रवासी मंच यांच्या वतीने ‘पीएमपी प्रवासी भाढेवाढ प्रवाशांसाठी व पीएमपीसाठी तारक की मारक’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते. त्यावेळी विविध पक्षांच्या प्रतिनिधींनी त्यांची मते व्यक्त केली. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रशांत जगताप, रिपब्लिकन पार्टीचे डॉ.सिद्धार्थ धेंडे, काँग्रेसचे संजय बालगुडे, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संदीप खर्डेकर, पीएमपी प्रवासी मंचाचे अध्यक्ष जुगल राठी, सचिव संजय शितोळे आदी उपस्थित होते.

जगताप म्हणाले, पीएमपीने दरवाढीचा घेतलेला निर्णयच बेकायदा आहे. एखादा धोरणात्मक निर्णय घेताना लोकांचा प्रतिनिधी संचालक मंडाळामध्ये असणे आवश्यक असते, पण आरटीएमध्येही लोकांचा प्रतिनिधी नव्हता, तसेच पीएमटी आणि पीसीएमटीचे एकत्रिकरणाचा निर्णय शहरासाठी मारक ठरत आहे.

डॉ.धेंडे म्हणाले, पीएमपीच्या दरवाढीला आमच्या पक्षाचा विरोध आहे, कारण या दरवाढीचा सर्वसामान्य नागरिकांना सर्वाधिक फटका बसणार आहे. दरवाढ करताना संचालन तूट का वाढते, हे पीएमपीने जाहीर केलेले नाही. प्रशासकीय चुकीमुळे तूट वाढत आहे.

बालगुडे म्हणाले, पीएमपीने अकरा वर्षांनंतर दरवाढ केली असली, तरी ही दरवाढ खूप आहे. ती कमी करावी. या दरवाढीचा दुसऱ्या आणि शेवटच्या स्टेजमध्ये प्रवास करणाऱ्यांना फटका बसणार आहे. तिकीट दरवाढ न होण्यासाठी पीएमपीच्या जागा विकसित करून, जाहिरातीमधून उत्पन्न वाढवावे.

काही गोष्ट बदल करण्यासाठी वस्तुनिष्ठ विचार करावा लागतो. २०१४ नंतर ही दरवाढ केली आहे. या काळात सीएनजी दर वाढले. एसटी महामंडळ, मुंबईत बेस्टने दरवाढ केली. एखादी संस्था जगण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात. पीएमपीला सदृढ करण्यासाठीच ही दरवाढ केली असून, ती योग्य आहे. गेल्या काही वर्षांपासून पीएमपीची तूट वाढत आहे. ही तूट दोन्ही महापालिका देतात. त्यामुळे दरवाढ करू नकाच, हे योग्य नाही. पीएमपी सक्षम करण्यासाठी तिथे चालणाऱ्या गैरप्रकाराकडे लक्ष केंद्रित करावे, असे संदीप खर्डेकर म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडpassengerप्रवासी