शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

‘एक राज्य एक नोंदणी’ आता पुणे जिल्ह्यातही; १ एप्रिलचा मुहूर्त, ठाण्याचाही समावेश

By नितीन चौधरी | Updated: March 19, 2025 13:59 IST

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने ‘एक राज्य एक नोंदणी’ असा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे.

पुणे : राज्यातील एका ठिकाणचा दस्त अन्य कोणत्याही जिल्ह्यात नोंदविता येण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा ‘एक राज्य एक नोंदणी’ हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर मुंबई शहर व उपनगर या दोन जिल्ह्यांत लागू करण्यात आला. त्यानंतर आता १ एप्रिलपासून पुणे व ठाणे जिल्ह्यांतही तो राबविण्यात येणार आहे. पुणे शहर व जिल्ह्यातील एकूण ४८ दुय्यम निबंधक केंद्रांमध्ये जिल्ह्यातील कोणत्याही गावातील दस्त नोंदविता येणार आहे.

राज्यात सध्या एका जिल्हा सहनिबंधक कार्यालयाच्या अखत्यारीत असलेल्या खरेदी-विक्रीच्या दस्तांची नोंदणी त्याच सहनिबंधक कार्यालयांमध्ये केली जाते. अनेकदा बाहेरील जिल्ह्यातील खरेदीदार दुसऱ्या जिल्ह्यात जमीन घर खरेदीचे व्यवहार करतात. अशांना संबंधित जिल्हा सहनिबंधक कार्यालयात जाऊन व्यवहार पूर्ण करावे लागतात. यातून मार्ग काढण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने ‘एक राज्य एक नोंदणी’ असा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. प्रायोगिक तत्त्वावर १७ फेब्रुवारीपासून मुंबई व उपनगर या दोन जिल्ह्यांमधील ३२ उपनिबंधक कार्यालये एकत्रितरीत्या जोडण्यात आली असून, मुंबईतील खरेदीदार या कार्यालयांमध्ये कोठेही दस्त नोंदणी करू शकणार आहेत.हाच उपक्रम राज्यात टप्प्याटप्प्याने राबविण्यात येत असून, १ एप्रिलपासून पुणे व ठाणे जिल्ह्यांत राबविण्यात येणार असल्याची माहिती नोंदणी उपमहानिरीक्षक अभयसिंह मोहिते यांनी दिली. आर्थिक वर्ष संपत आल्याने मार्चअखेरपर्यंत दस्तनोंदणींची संख्या जास्त असते. तसेच यंदा रेडिरेकनर दरांत वाढ होण्याचे संकेत असल्याने दस्तांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे राज्यातही लवकरच हा उपक्रम लवकर लागू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.पुणे शहरात २७ दुय्यम निबंधक कार्यालये आहेत. तर जिल्ह्यात २१ कार्यालयांमधून दस्त नोंदणी केली जाते. या सर्व ४८ कार्यालयांचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे शहरातील खरेदीदाराने बारामती तालुक्यातील जमीन खरेदी केल्यास त्याला दस्त नोंदणीसाठी तेथील कार्यालयात न जाता पुण्यातील कोणत्याही कार्यलयात नोंदणी करता येणार आहे. तसेच इंदापूर तालुक्यातील एखाद्याने पुणे शहरात सदनिका खरेदी केल्यासही त्याला पुणे शहरात न येताही दस्त नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती पुणे जिल्हा सहनिबंधक प्रवीण देशपांडे यांनी दिली. या उपक्रमामुळे नागरिकांचा वेळ तसेच पैसाही वाचणार आहे, अशी माहिती पुणे शहर सहनिबंधक संतोष हिंगाणे यांनी दिली.

दस्त नोंदणीसाठी वापरण्यात येणाऱ्या आय सरिता १.९ या प्रणालीच्या माध्यमातून एक राज्य एक नोंदणी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. येत्या १ एप्रिलपासून पुणे व ठाणे जिल्ह्यांत हा उपक्रम राबविला जाणार आहे.  - अभयसिंह मोहिते, नोंदणी उपमहानिरीक्षक, पुणे 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकारcivic issueनागरी समस्या