पुणे : महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) संघटनात्मक पातळीवर बदलाचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख अजित पवार यांनी पुण्यात एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीला आमदार दत्तात्रय भरणे आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची उपस्थिती होती.
या बैठकीनंतर पक्षाच्या जिल्हा युवक संघटनेत मोठा बदल जाहीर करण्यात आला असून, निलेश थिगळे यांची पुणे जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. निलेश थिगळे हे गेल्या नऊ वर्षांपासून पुणे जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. संघटनात्मक कामाचा मोठा अनुभव आणि युवकांमध्ये असलेली लोकप्रियता लक्षात घेऊन त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
जिल्हा परिषद निवडणुकांच्या तयारीदरम्यान नेतृत्वाची संधीआगामी जिल्हा परिषद निवडणुकांसाठी निलेश थिगळे यांनी तयारीही सुरू केली होती. मात्र ऐनवेळी पक्षप्रमुख अजित पवार यांनी वेगळे यांच्यावर जिल्हा युवक संघटनेची मोठी जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला. पक्षाला सध्या संघटन मजबूत करण्याची अधिक गरज असून, तरुण नेतृत्वाला पुढे आणण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
निलेश थिगळे यांचे वकृत्व प्रभावी असून, तरुण कार्यकर्त्यांमध्ये त्यांची चांगली पकड आहे. हीच प्रतिमा आगामी काळात पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेससाठी फायदेशीर ठरू शकते, असा विश्वास पक्ष नेतृत्वाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
“पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण ताकदीने पार पाडणार” –निलेश थिगळेजिल्हा युवक अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर निलेश थिगळे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “पक्षप्रमुख अजित पवार यांनी माझ्यावर सोपवलेली जबाबदारी मी चोखपणे पार पाडणार आहे. राजकारणात प्रत्येकाला महत्त्वाकांक्षा असतात. मीही जिल्हा परिषदेची तयारी केली होती. मात्र पक्षातील वरिष्ठ नेत्यांना कुठल्या कार्यकर्त्यांना कुठे न्याय दिला पाहिजे हे चांगले माहीत असते.”
ते पुढे म्हणाले, “पक्ष संघटनेच्या माध्यमातून काम करणारे अनेक नेते आज राज्याच्या राजकारणात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. अजित दादांनी मला विश्वासात घेऊन माझी गरज सध्या पक्षाला अधिक असल्याचे पटवून दिले. त्यामुळे त्यांनी दिलेली जबाबदारी मी नक्कीच पूर्ण ताकदीने पार पाडेन.”
तरुणांना पक्षात जोडण्यावर भरआगामी काळात अधिकाधिक तरुणांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कसे आणता येईल, युवकांच्या प्रश्नांना प्राधान्य कसे देता येईल, यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचेही निलेश थिगळे यांनी स्पष्ट केले. महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर पक्ष संघटना नव्याने उभारण्याच्या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात असून, जिल्हा परिषद निवडणुकांआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हालचालींना वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत.
Web Summary : NCP appoints Nilesh Thigale as Pune district youth president amid organizational changes after municipal election losses. Focus is on strengthening the party, especially among youth, ahead of upcoming Zilla Parishad elections. Thigale pledges to fulfill his responsibilities.
Web Summary : नगरपालिका चुनाव में हार के बाद राकांपा ने नीलेश थीगले को पुणे जिला युवा अध्यक्ष नियुक्त किया। आगामी जिला परिषद चुनावों से पहले पार्टी को मजबूत करने, खासकर युवाओं के बीच, पर ध्यान केंद्रित किया जा रहा है। थीगले ने अपनी जिम्मेदारियों को पूरा करने का संकल्प लिया।