शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मनपाची नागरी सुविधा केंद्रे वाऱ्यावर;ठेकेदाराची मुदत संपल्यावर दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 15:44 IST

काही केंद्रांचा वापर आरोग्य कोठ्यांसाठी

- हिरा सरवदे पुणे : नागरिकांना विविध सेवा-सुविधा देण्यासाठी महापालिकेने शहरात उभारलेली नागरी सुविधा केंद्रे सध्या बेवारस स्वरूपात असून, संबंधित ठेकेदाराची मुदत संपल्यानंतर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे केंद्रांमध्ये अतिक्रमणे थाटण्यात आली असून, काही केंद्रांमध्ये महापालिकेने आरोग्य कोठी सुरू केल्या आहेत.महापालिकेने साधारण २००६ मध्ये शहरातील विविध नागरी सुविधा केंद्रे सुरू केली होती. या प्रकल्पाच्या अटी व शर्तींवरून महापालिकेतील तत्कालीन सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले होते. या केंद्रामध्ये विविध कर भरणे, विविध अर्ज, तक्रारी आदी दाखल करता येत होत्या. त्याबरोबर पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणे, नळजोडणी, ड्रेनेजसंबंधित अडचणींबाबत अर्ज, तक्रारी प्रशासनापर्यंत पोहाेचवता येत होत्या.करारापूर्वी काम थांबवल्यास संबंधित ठेकेदाराला महापालिकेला पैसे द्यावे लागणार होते. त्यामुळे निविदेची मुदत संपेपर्यंतच ही केंद्रे चालवण्यात आली. त्यानंतर महापालिका प्रशासनाने याकडे फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळे सुविधा केंद्रांचे स्ट्रक्चर व या जागा खासगी व्यावसायिकांनी बळकावल्या आहेत. अनेक ठिकाणच्या केंद्रांच्या काही जागांवर हॉटेल व अन्य व्यवसाय सुरू आहेत, तर काही ठिकाणी राजकीय मंडळींनी आपली कार्यालये थाटली आहेत. काही केंद्रांचा वापर आरोग्य कोठींसाठी करण्यात येत आहे. या केंद्रांबाबत महापालिका प्रशासनाकडे विचारणा केल्यानंतर ही केंद्र कोणत्या खात्याच्या अंतर्गत येतात, याची माहितीच अधिकाऱ्यांना नसल्याचे समाेर आले आहे. सध्या ६१ ठिकाणी केंद्रेजुनी नागरी सुविधा केंद्रे बंद झाल्यानंतर महापालिकेने क्षेत्रीय कार्यालये आणि समाज मंदिर अशा ६१ ठिकाणी नव्याने नागरी सुविधा केंद्रे सुरू केली आहेत. या केंद्रांवर विविध कर, नगररचना, झोनिंग, बांधकाम परवानगी, अग्निशमन, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, जकात आदींशी संबंधित दाखले आणि परवाने आशा १८ सुविधा दिल्या जात आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रMuncipal Corporationनगर पालिका