शहरं
Join us  
Trending Stories
1
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
2
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
3
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
4
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
5
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
6
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
7
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
8
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
9
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
10
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
11
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
12
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
13
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
14
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
15
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
16
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
17
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
18
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
19
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
20
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!

माऊलींचा सोहळा पावसाच्या सरी झेलत पुणे जिल्ह्यात दाखल; परतीच्या प्रवासातही माऊलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 13:07 IST

नीरा स्नानानंतर परतीच्या वारीत चालत चाललेल्या टाळकरी, विणेकरी, पताकाधारी, तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला यांना माऊलींच्या पादुकांचे स्पर्श दर्शन दिले गेले. 

नीरा : आषाढी एकादशीच्या पांडूरंगाच्या दर्शनानंतर आज मंगळवारी संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याने पावसाच्या सरी झेलत पुणे जिल्ह्यात प्रवेश केला. परतीच्या  प्रवासातील सातारा जिल्ह्यातील पाडेगाव ते पुणे जिल्ह्यातील वाल्हे हे सर्वात कमी अंतराचा टप्पा आज आहे. परतीच्या प्रवासातही माऊलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान घालण्यात आले. नीरा स्नानानंतर परतीच्या वारीत चालत चाललेल्या टाळकरी, विणेकरी, पताकाधारी, तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला यांना माऊलींच्या पादुकांचे स्पर्श दर्शन दिले गेले. 

संत ज्ञानेश्वर महाराजांचा २७८ वा पालखी सोहळा यावर्षी संपन्न होत आहे. सोमळवार (दि.१४) रोजी सातारा जिल्हयातील पाडेगाव येथे मुक्काम होता. मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून पावसाने दमदार सुरुवात केली. पावसाच्या सरी अंगावर झेलत सकाळी आठ वाजता पालखी  सोहळा नीरा नदी किनारी आला. आकर्षक फुलांनी सजवलेल्या रथातील पालखीतून माऊलींच्या पादुका सोहळा प्रमुख डॉ.भावार्थ देखणे यांनी सोहळा मालक राजाभाऊ आरफळकर यांच्याकडे नीरा नदितील स्नानासाठी देण्यात आल्या. आरफळकर, चोपदार व त्यांच्या सहकार्यांनी 'ज्ञानोबा माऊली.. ज्ञानोबा माऊली' च्या जयघोषात प्रसिद्ध दत्ता घाटावर माऊलींच्या पादुकांना स्नान घातले. 

माऊलींचे स्नान सुरु असताना सोहळ्या सोबत आलेले पुरुष विणेकरी, पताकाधारक व तुळशीवृंदावन घेतलेल्या महिलांनी ब्रिटिशकालीन पुलावरील रथाच्या पुढे व मागे दोन रांगा केल्या होत्या. पादुका पुन्हा रथाकडे आल्यावर प्रथम रथा पुढील व नंतर रथा मागील विणेकऱ्यांसह पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना माऊलींच्या पादुकांचे स्पर्शदर्शन देण्यात आले. हा अभुतपुर्व सोहळा पाहण्यासाठी नीरा पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी केली होती. परतीच्या प्रवासातील हा सोहळा 'माऊली माऊलीच्या' जयघोषात पावसाच्या सरीत मोठ्या उत्साहात व शांतते पारपडला. यानंतर माऊलींच्या सोहळ्याने सकाळी नऊ वाजता पुणे जिल्ह्यातील नीरा शहरात प्रवेश करत माऊलींची पालखी विठ्ठल मंदिरात साडेनऊच्या सुमारास विसाव्यासाठी ठेवण्यात आली. दुपारी दोन वाजता हा सोहळा पुणे जिल्ह्यातील पहिला मुक्काम असलेल्या वाल्हेकडे मार्गस्त होणार आहे. 

नीरा नदीच्या किनाऱ्यावरील पालखीतळ व छत्रपती शिवाजी चौकात नीरा सह परिसरातील भाविकांनी स्वागत केले. अहिल्याबाई होळकर चौकातून नीरेतील युवकांनी रथातील पालखी खांद्यावर घेऊन येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ठेवली. यावेळी नीरा सह परिसरातील भाविकांनी पालखीतील माऊलींच्या पादुकांवर डोके ठेवून मोठ्या श्रद्धेने दर्शन घेतले. यावर्षी दर्शनासाठी अभुतपुर्व गर्दी होती. त्यामुळे पुरुषांची व महिलांची अशा दोन रांगा लावण्यात आल्या होत्या.  

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड