पुणे : येरवडा येथील शासनाच्या जागेवरील शैक्षणिक संकुलाचे आरक्षण वगळून ती जागा महामेट्रोला कमर्शियल कॉम्प्लेक्स उभारण्याची प्रक्रिया महापालिका प्रशासनाने सुरू केली असून, याबाबत हरकती व सूचना मागविल्या आहेत.
येरवडा येथे राज्य शासनाची सुमारे साडेतीन एकर जागा आहे. या जागेवर महापालिकेच्या विकास आराखड्यात शैक्षणिक संकुलाचे आरक्षण आहे. परंतु, राज्य शासनाने ही जागा मेट्रोला देण्याचा निर्णय घेतला आहे.
याचाच आधार घेत विभागीय आयुक्तांनी महापालिकेने या जागेवर असलेले शैक्षणिक संकुलाचे आरक्षण उठवावे, असे पत्र पाठविले होते. या पत्रानुसार महापालिका प्रशासनाने जागेवरील आरक्षण बदलण्याची प्रक्रिया सुरू केली असून, नागरिकांच्या हरकती व सूचना मागविल्या आहेत, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.