शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

लोणी काळभोर वाहतूक विभागाचे वाहतूक नियमनापेक्षा वसुलीवर भर; वाहतूक कोंडी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 14:39 IST

लोणी काळभोर वाहतूक विभागातील काही ठराविक पोलीस अंमलदार सोडले तर इतर पोलीस वाहतूक कोंडीच्या वेळी वाहतूक नियमन करण्याऐवजी वसुलीकडे लक्ष देत आहेत.

लोणी काळभोर : लोणी काळभोर वाहतूक विभागातील काही ठराविक पोलीस अंमलदार सोडले तर इतर पोलीस वाहतूक कोंडीच्या वेळी वाहतूक नियमन करण्याऐवजी वसुलीकडे लक्ष देत आहेत. त्यामुळे पूर्व हवेलीत वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र नित्याचेच झाले आहे.  पुणे–सोलापूर महामार्गावर कवडीपाट टोलनाका ते उरुळी कांचन या दरम्यान लोणी स्टेशन, कुंजीरवाडी, नायगाव फाटा व उरुळी कांचन हद्दीतील एलाईट चौक आणि तळवाडी चौक अशा पाच ठिकाणी वाहतुकीची कोंडी सतत जाणवत आहे.लोणी स्टेशन हद्दीत स्टेशन चौक ते कदमवस्ती या दरम्यान वाहने रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात उभी केली जात आहेत. असे असतानाही वाहतूक पोलिस रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांना अभय देत असल्याने लोणी स्टेशन हद्दीत दिवसाआड अपघात होत आहेत.ऑईल कंपन्यांचे टँकर रस्त्यावर उभे राहत असल्याची समस्या पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांना डोळ्यांनी दिसत असतानाही सर्वजण डोळे बंद करून बसले आहेत. वाहतूक विभागातील पोलिस या चौकातील वाहतूक कोंडी दूर करण्याऐवजी या चौकातून ये-जा करणाऱ्यांकडून वसुलीचे काम करत असल्याचे दिसून येत आहे.गरीब वाहनधारकांसह सर्वसामान्य वाहनधारकांना वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार वाहनांचा फोटो काढून मोठा दंड आकारत आहेत, तसेच अनेक वाहनधारकांशी हुज्जत घालून त्यांचा अपमान करत आहेत. विशेष म्हणजे, यात अनेक वाहनधारकांची कुठलीच चूक नसताना हा आर्थिक फटका नाहक सहन करावा लागत आहे. यामुळे वाहतूक पोलिसांचे नेमके उद्दिष्ट “वसुली की वाहतूक नियमन?” असा प्रश्न उभा राहिला आहे. ‘वसूली’ कर्मचाऱ्यावर कारवाई होणार का?लोणी स्टेशन चौकातील वाहतूक सुरळीत करण्याऐवजी वाहतूक पोलीस भररस्त्यात एका नामांकित हॉस्पिटलच्या गेटसमोर उभा राहत असून, रस्त्यात गाड्या अडवून त्यांच्याकडून पठाणी वसुली करत आहे. वाहतूक पोलीस रस्त्यातच थेट समोर येत असल्याने वाहनचालकांची गडबड होत आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच वाहतूक पोलिस व त्यांचे वरिष्ठ अधिकारी जागे होणार का? आणि या ‘वसूली’ कर्मचाऱ्यावर प्रशासनाच्या वतीने काय कारवाई होणार, याकडे पूर्व हवेलीतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.लोणी स्टेशनच्या पुढील चौकाला एमआयटी कॉर्नर नावाने मागील काही वर्षांपासून ओळखले जाऊ लागले आहे. मात्र, हा कॉर्नर आता अपघातांचे मोठे ठिकाण बनू लागला आहे. कॉर्नरच्या दोन्ही बाजूंना असलेल्या हॉटेलमालकांनी पार्किंगसाठी जागा न सोडल्याने हा चौक अतिशय धोकादायक बनला आहे. आशीर्वाद हॉटेलच्या बाजूने स्टेशनहून गावात जाताना एमआयटी कॉर्नरची अवस्था अतिशय चिंताजनक वाटावी अशी बनली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Loni Kalbhor Traffic Police Focus on Collection, Traffic Jams Worsen.

Web Summary : Loni Kalbhor traffic police prioritize fines over traffic management, causing congestion. Key areas like Loni Station and MIT Corner are accident-prone due to illegal parking and lack of regulation. Citizens question if revenue collection is prioritized over public safety. Action urged.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेTrafficवाहतूक कोंडी