शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शिरूर पोलिस ठाण्यात वकील, शेतकऱ्यांचा गोंधळ; नेमकं कारण काय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 15:13 IST

शिरूर शहराजवळ शिरूर ते करडे गावादरम्यान अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याचे रुंदीकरण काम औद्योगिक विकास महामंडळाकडून सुरू आहे. यास स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध आहे.

शिरूर : शिरूर ते करडे गावा दरम्यान सुरू असलेले रस्त्याचे रुंदीकरण व वीज वाहक खांबांच्या कामाला विरोध करत स्थानिक शेतकऱ्यांनी आंदोलन केले. यातील आंदोलकांची धरपकड केल्याने शिरूर पोलिस ठाण्यात शेतकरी व वकिलांनी गोंधळ घातला.शिरूर शहराजवळ शिरूर ते करडे गावादरम्यान अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याचे रुंदीकरण काम औद्योगिक विकास महामंडळाकडून सुरू आहे. यास स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध आहे. या रस्त्यासाठी शासकीय मोजणी करण्यात आली नाही. येथील शेतकऱ्यांच्या जमिनींचे भूसंपादन केलेले नाही. अशाप्रकारे औद्योगिक विकास महामंडळ मनमानी पद्धतीने हे काम करत असून अनेक शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे.याबाबत शेतकरी न्यायालयात गेले आहेत. असे असताना बुधवारी (दि.२३ ) दुपारी याच रस्त्याच्या बाजूने विजेचे खांब उभे करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. हे समजताच परिसरातील शेतकरी त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी आंदोलन करत हे काम बंद पाडले. दरम्यान औद्योगिक विकास महामंडळाने या कामासाठी पोलिस संरक्षणाची मागणी केली होती. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर शिरूर पोलिसांनी आंदोलनस्थळी धाव घेत आंदोलकांची धरपकड केली. या आंदोलकामध्ये ॲड. मगर हे होते. पोलिसांनी त्यांनाही पकडून गाडीत घातले व सर्वांना पोलिस ठाण्यात आणले. ही माहिती कळताच घोडनदी बार असोसिएशनच्या पदाधिकारी व इतर वकिलांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. तसेच मोठ्या प्रमाणावर स्थानिक शेतकरीही पोलिस ठाण्यात आले. पोलिसांनी बेकायदेशीर कारवाई केल्याचे आरोप करत तसेच मारहाण केल्याचे आरोप करत येथे गोंधळ घातला.

दरम्यान, पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी आंदोलकांना नोटीस बजावून सोडत असल्याचे सांगितले. कायदेशीर मार्गाने लढा लढण्याचे सांगत सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले. या प्रसंगी ॲड. निनाद मगर, घोड नदी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अमित खेडकर, ॲड. शिरीष लोळगे, ॲड. संजय वखारे, बाजीराव वखारे यांच्यासह इतर वकील, महिला व शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड