शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
3
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
4
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
5
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
6
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
7
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
8
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
9
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
10
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
11
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
12
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
13
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
14
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
15
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
16
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
17
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
18
घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती
19
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
20
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!

पूर्वकल्पना दिली नसल्याने रिंगरोडबाधित जमिनीची मोजणी करून देणार नाही; शेतकऱ्यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 15:48 IST

१५ तारखेला कदमवाकवस्ती हद्दीत भूसंपादनाची नोटीस उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे यांनी काढली आहे?

लोणी काळभोर : प्रारूप विकास योजनेतील ६५ मीटर रुंद रस्त्यासाठी सन २०१५ च्या नवीन भूसंपादन अधिनियमाद्वारे खासगी वाटाघाटीने थेट खरेदी करावयाच्या जमिनीच्या भूसंपादन प्रकियेची मोजणी येत्या १५ तारखेला कदमवाकवस्ती हद्दीत पोलिस बंदोबस्तात करण्यात येणार असल्याची नोटीस भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे यांनी काढली आहे; परंतु या मोजणीसंदर्भात रिंगरोडबाधित शेतकऱ्यांना कसलीही नोटीस बजावण्यात आली नसल्याचे स्थानिक शेतकरी म्हणत आहेत.

या रिंगरोडमध्ये जाणाऱ्या जमिनीचा व घरांचा मोबदला कसा देणार? किती देणार? याबाबतदेखील कोणतीही पूर्वकल्पना शेतकऱ्यांना मिळाली नसल्याचा आरोप रिंगरोडबाधित शेतकऱ्यांनी केला आहे. या रिंगरोडमध्ये जमिनी गेल्याने काही शेतकरी व नागरिकांचे पूर्वजात व्यवसाय बंद पडणार असून, काही लोक बेघरदेखील होणार आहेत. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांचे पुनर्वसन करूनच मोजणी करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील मधुबन कार्यालयात यासंदर्भात रिंगरोडबाधित शेतकऱ्यांची बैठक शुक्रवारी (दि. ११) संध्याकाळी पार पडली. यावेळी शेतकऱ्यांनी मोबदल्याबाबत भूमिका स्पष्ट केली. या बैठकीस शेतकरी गणपत चावट, माजी उपसरपंच बाबाराजे काळभोर, सदस्य आकाश काळभोर, उद्योजक किशोर टिळेकर, सुशील चावट, मुकुंद काळभोर, सुभाष काळभोर, बाबूशेट काळभोर व इतर शेतकरी उपस्थित होते.

रिंगरोडसाठी अंदाजे १७ एकर जमीनपुणे रिंगरोड हा ६५ मीटरचा असून बावडी, लोहगाव, वाघोली, मांजरी खुर्द, कदमवाकवस्ती येथील रिव्हर व्ह्यू सिटीजवळून पिराच्या मंदिरापासून फुरसुंगी व पुढे वडकीच्या दिशेने जाणार आहे. या रिंगरोडमध्ये कदमवाकवस्ती येथील शेकडो शेतकऱ्यांची अंदाजे १७ एकर जमीन (६७५८१.५४ चौ.मी.) या रस्त्यामध्ये जाणार आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडroad transportरस्ते वाहतूकAgriculture Sectorशेती क्षेत्र