शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

खेड तालुक्यात पुनर्वसन जमिनीच्या व्यवहारात गैरप्रकार; दिलीप मोहिते यांचा आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 13:32 IST

- खेड तालुक्यात पुनर्वसन जमिनीच्या व्यवहारात लॅन्ड माफिया आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने नियम डावलून दस्तनोंदणी होत असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केला आहे.

राजगुरूनगर/ शेलपिंपळगाव:खेड तालुक्यात पुनर्वसन जमिनीच्या व्यवहारात लॅन्ड माफिया आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने नियम डावलून दस्तनोंदणी होत असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केला आहे. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अन्यथा आठ दिवसांनंतर जिल्हा दुय्यम निबंधक कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

बहुळ येथील गट क्रमांक ५३५/२ या पुनर्वसन जमिनीच्या ८० आर क्षेत्राचे खरेदीखत खेडच्या दुय्यम निबंधक कार्यालयात तहसीलदारांच्या पूर्वपरवानगीशिवाय आणि कार्यालयीन वेळ संपताना ऑफलाइन पद्धतीने दि. २५ जुलै रोजी नोंदवण्यात आले. या गैरप्रकाराची माहिती मिळाल्यानंतर माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी दि. २८ जुलै रोजी कार्यकर्त्यांसह खेड दुय्यम निबंधक कार्यालयात धडक देत अधिकारी सुनील परदेशी यांना जाब विचारला. मात्र, परदेशी यांना या नोंदणीबाबत समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आणि तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या पत्राचा हवाला दिला.मोहिते पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला की, १ एप्रिल २०२५ नंतर राज्यात ऑफलाइन दस्तनोंदणी बंद आहे. केवळ सक्षम अधिकाऱ्याच्या लेखी आदेशानंतरच अशी नोंदणी होऊ शकते. मात्र, कोणतीही परवानगी नसताना आणि ऑनलाइन प्रक्रिया उपलब्ध असताना घाईघाईने हा दस्त का नोंदवला? याबाबत मोहिते पाटील यांनी परदेशी आणि श्रीमती पोळ या दोन अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केली.शेतकऱ्याची फसवणूक

गुंजवणी धरणात बुडीत क्षेत्रासाठी ज्ञानोबा विठ्ठल शिराळे (रा. निवी, ता. वेल्हे) यांना ही जमीन पुनर्वसनात मिळाली होती. दि. १३ जून २०२५ रोजी त्यांना या जमिनीचा ताबा देण्यात आला. मात्र, एजंटांनी त्यांना गाठून खेड तालुक्यातील दोन व्यक्तींनी वेगवेगळ्या दस्तांद्वारे काही रक्कम देऊन साठेखत केले. भोगवटा वर्ग शर्त लागू असताना शेतकऱ्याला एकाने पळवून नेले आणि कार्यालयीन वेळ संपताना बनावट व्यवहार पूर्ण केला. यात दुय्यम निबंधक सुनील परदेशी यांनी पाच लाख रुपये घेऊन नियम डावलून ऑफलाइन दस्तनोंदणी केल्याचा आरोप आहे.ऑफलाइन दस्तनोंदणी बेकायदाखेड तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी स्पष्ट केले की, कोणत्याही प्रकारची ऑफलाइन दस्तनोंदणी चुकीची आहे. शासनाने संगणकीकृत सातबारा प्रणाली लागू केली असून, ऑनलाइन नोंदणीमुळे सातबारा उताऱ्यावरील नोंदी स्पष्ट होतात. नागरिकांनी सर्व व्यवहारात ऑनलाइन दस्तनोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.आंदोलनाचा इशारा

माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी तालुक्यातील अशा अनेक चुकीच्या दस्तनोंदणींची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. याप्रकरणी आठवडाभरात कारवाई न झाल्यास जिल्हा दुय्यम निबंधक कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडKhedखेड