शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइलवरून झटपट ऑनलाइन कर्ज ठरतायेत फसवणुकीचा फंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 16:08 IST

- राज्यातील, देशातील किंवा जगातील कोणतीच कंपनी दोन मिनिटांत कर्ज मंजूर करत नाही. सुरुवातीला या ॲपवर अर्जदाराचा पॅन क्रमांक मागितला जातो.

- पंढरीनाथ नामुगडेलोणी काळभोर : मोबाइलवर ऑनलाइन लोन ॲपमधून २० ते ४० मासिक टक्केवारीने घेतलेले कर्ज वसुलीसाठी लोन ॲपकडून ग्राहकांची नाहक बदनामी व मानसिक त्रास देण्याचे प्रकार लोणी काळभोर परिसरात सध्या सुरू आहेत. पीडित ग्राहकाने नाव न छापण्याच्या बोलीवर हा प्रसंग लोकमतशी बोलताना दिला.

पीडित युवकाने मोबाइलवरील लोन ॲपवरून काही ठराविक रक्कम कर्जस्वरूपात घेतली. त्यासाठी त्याने त्या ॲपवर आधार कार्ड, पॅन कार्ड व स्वतःचा सेल्फी तसेच आपल्या मोबाइलमधील लोकेशन, कॉन्टॅक्ट लिस्ट वापरायची परवानगीदेखील त्या ॲपला दिली. परंतु, कर्ज परत करण्याच्या तारखेला कर्ज भरले गेले नसल्याने लोन ॲपवाले त्या युवकास इंटरनॅशनल कॉलवरून धमक्या, शिवागीळ, तसेच कर्ज घेतलेल्या युवकाचे फोटो एडिट करून अश्लील बनवून ते त्याच्या फोन लिस्टमधील लोकांना पाठवत आहेत. परंतु, पीडित युवक समाजात अब्रू जाईल या उद्देशाने पोलिसात तक्रार देत नाहीत.

राज्यातील, देशातील किंवा जगातील कोणतीच कंपनी दोन मिनिटांत कर्ज मंजूर करत नाही. सुरुवातीला या ॲपवर अर्जदाराचा पॅन क्रमांक मागितला जातो. त्यानंतर उत्पन्न विचारले जाते. ही माहिती दिल्यानंतर अर्जदाराने सेल्फी काढून पाठवणे बंधनकारक असते. या काळात अर्जदाराचे जीपीएस कनेक्शन सुरू करून कर्ज देणारी कंपनी लोकेशन पडताळून पाहते. यामुळे तुमचे लोकेशन कंपनीकडे असते. या सर्व गोष्टी ऑनलाइन होत असल्याने ही सगळी प्रक्रिया नेमक्या कोणत्या व्यक्ती करत आहेत, कोठून करत आहेत, याची कोणतीही माहिती कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीला नसते. अशा फसवणुकीला बळी न पडण्यासाठी अनधिकृत लिंकवर क्लिक करू नका. सायबर तक्रारींची नोंद http:/cybercrime.gov.in या पोर्टलवर किंवा १९३० या हेल्पलाइनवर तत्काळ नोंदवा असे आवाहन सायबर क्राईम पुणे विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.

कर्ज घेतल्यानंतर नागरिकांना मनस्ताप

कमी वेळात कर्ज देऊ करणारी अनेक ॲप काही छोट्या रकमेची कर्ज देतात. त्यानंतर एका आठवड्याच्या आत ती रक्कम परत केली नाही, तर ते दररोज फोन करून त्रास द्यायला सुरुवात करतात. अनेकदा व्हिडीओ कॉल करून शिवीगाळ करणे, मेसेज करून शिवराळ भाषेत बोलणे, कॉल यादीतील इतर लोकांना कॉल करून त्यांना कर्ज घेतलेल्या व्यक्तीबद्दल बोलणे, अशा अनेक गोष्टी करून अधिकाधिक त्रास देण्याचा प्रयत्न या कंपन्यांनी नेमलेल्या वसुली एजन्सीकडून केला जात आहे.  

लोणी काळभोर पोलिस स्टेशन हद्दीतील नागरिकांनी अशा ऑनलाइन लोन ॲप डाउनलोड करू नये. अनोळखी नंबरवरून आलेल्या कॉलला बँक खाते क्रमांक, पॅन नंबर व ओटीपी देऊ नये.फसवणूक झालेल्या नागरिकांनी वेळ न घालवता त्वरित लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार द्यावी.  - राजेंद्र पन्हाळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, लोणी काळभोर पोलीस ठाणे 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Instant loan apps becoming traps, defaming borrowers: Beware of fraud!

Web Summary : Online loan apps in Loni Kalbhor are harassing borrowers with high interest rates, blackmail, and defamation. Victims fear social stigma and hesitate to report. Police urge caution against unauthorized links and immediate reporting of cybercrimes.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcyber crimeसायबर क्राइमCrime Newsगुन्हेगारीPuneपुणे