शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शहरात फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ; ‘इन्फ्लुएन्झा’ विषाणूचा प्रादुर्भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 20:12 IST

दीर्घ फ्लू झालेल्या रुग्णांना पूर्णपणे बरे होण्यासाठी तीन ते चार आठवड्यांचा कालावधी लागत आहे, असे वैद्यकीयतज्ज्ञांनी सांगितले

पुणे : शहरात बदलत्या हवामानामुळे ताप, सर्दी, खोकला या आजारांचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. यामध्ये विशेषतः ‘इन्फ्लुएन्झा’ विषाणूंच्या (एच१ एन१, एच ३ एन २) संसर्गाचे प्रमाण जास्त आढळत असून, काही रुग्णांमध्ये ‘दीर्घ फ्लू’ची लक्षणे दिसून येत आहेत.

दीर्घ फ्लू झालेल्या रुग्णांना पूर्णपणे बरे होण्यासाठी तीन ते चार आठवड्यांचा कालावधी लागत आहे, असे वैद्यकीयतज्ज्ञांनी सांगितले. शहरात यंदा मे महिन्यापासून पावसाला सुरुवात झाली. जूनमध्ये काही प्रमाणात पाऊस झाल्यानंतर जुलैमध्ये पावसाचे प्रमाण कमी झाले. मात्र, ऑगस्टमध्ये पुन्हा पावसाचे प्रमाण वाढले असून यामुळे फ्लू व संसर्गजन्य आजारांमध्ये वाढ झाल्याचे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले आहे.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, एच ३ एन २ विषाणूच्या रुग्णांना हंगामी फ्लूपेक्षा बरे होण्यासाठी अधिक वेळ लागत आहे. साधारण फ्लूमध्ये रुग्ण ३ ते ४ दिवसांत बरा होतो, परंतु एच ३ एन २च्या रुग्णांना पूर्णपणे बरे होण्यासाठी ३ ते ४ आठवडे लागू शकतात. या विषाणूचा संसर्ग सर्व वयोगटातील नागरिकांमध्ये आढळून येत आहे. मात्र, ज्येष्ठ नागरिक व आधीपासून असलेल्या दीर्घकालीन आजारांनी (डायबेटीस, हृदयविकार, दमा) त्रस्त रुग्णांना बरे होण्यासाठी जास्त वेळ लागत आहे. काही रुग्णांमध्ये न्यूमोनियाची लक्षणेदेखील दिसून येत आहेत.

फ्लूची प्रमुख लक्षणे : ताप, घशात खवखव, खोकला, अंगदुखी, धाप लागणे, थकवा, काहींमध्ये न्यूमोनिया, संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. हवामानातील बदलामुळे फक्त फ्लूच नव्हे, तर डासांच्या उत्पत्तीमुळे डेंग्यूसदृश रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्याचबरोबर पावसाळ्यात बाहेरील अन्न व दूषित पाणी सेवन केल्याने टायफॉइडचे रुग्णही वाढत आहेत. नागरिकांनी पावसाळ्यात जास्तीत जास्त काळजी घ्यावी, असे वैद्यकीयतज्ज्ञांनी सांगितले.

नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, उघड्यावरचे व अस्वच्छ अन्न टाळावे. लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. स्वतःहून औषधे घेऊ नयेत. सद्यस्थितीत ताप व न्यूमोनियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. मात्र, दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. विशेषतः ज्येष्ठांना बरे होण्यासाठी अधिक वेळ लागत असल्याने तापाची लक्षणे दिसताच नागरिकांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. - डॉ. हरिदास प्रसाद, विभागप्रमुख, औषध वैद्यकशास्त्र विभाग, ससून.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड