शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

७९ वर्षांच्या स्वातंत्र्यानंतरही रस्ता नाही; जखमी वृद्धाला झोळीत टाकून ३ किमी पायपीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 14:30 IST

- पावसाळ्यामुळे कच्चा रस्ता चिखलमय झाल्याने कोणतेही वाहन वस्तीपर्यंत पोहोचू शकले नाही. भरपावसात ग्रामस्थांना चिखल तुडवत तब्बल पाऊण तास पायपीट करावी लागली.

भोर : स्वातंत्र्याला ७९ वर्षे पूर्ण झाली, तरीही भोर तालुक्यातील दुर्गम बोपे गावातील वाघमाचीवाडी कचरे वस्तीला अद्याप पक्का रस्ता नाही. यामुळे जखमी वृद्धाला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यासाठी ग्रामस्थांना ३ किलोमीटरपर्यंत चिखल तुडवत झोळीत टाकून पायपीट करावी लागली.

भोरपासून ७० किलोमीटर अंतरावर भाटघर धरणाच्या शेवटच्या टोकावर भोर आणि वेल्हे तालुक्याच्या सीमेवर वसलेल्या बोपे गावातील वाघमाचीवाडी कचरे वस्तीतील ज्येष्ठ नागरिक रामभाऊ कचरे (वय ६५) हे गुरे चारण्यासाठी रानात गेले असताना घसरून पडले. यात त्यांचा पाय मोडला. गावाला पक्का रस्ता नसल्याने त्यांना झोळीत टाकून ३ किलोमीटर पायपीट करत मुख्य रस्त्यापर्यंत नेण्यात आले. पावसाळ्यामुळे कच्चा रस्ता चिखलमय झाल्याने कोणतेही वाहन वस्तीपर्यंत पोहोचू शकले नाही. भरपावसात ग्रामस्थांना चिखल तुडवत तब्बल पाऊण तास पायपीट करावी लागली. मुख्य रस्त्यावर पोहोचल्यानंतर खासगी वाहनाने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रस्त्याच्या अभावामुळे उपचाराला उशीर झाला.

कच्चा रस्ता उपलब्धकचरे वस्तीला पक्का रस्ता नसल्याने आजारी वृद्ध आणि बालकांना रुग्णालयात नेण्यासाठी नेहमीच अशा कष्टप्रद पायपिटीला सामोरे जावे लागते. पावसाळ्यात रस्ता पूर्णपणे बंद होत असल्याने दळणवळणाची समस्या गंभीर बनते. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. प्रत्येक पावसाळ्यात आम्हाला अशा समस्यांना तोंड द्यावे लागते. आजारी व्यक्तीला रुग्णालयात नेण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागते, असे वस्तीतील एका ग्रामस्थाने सांगितले. डोंगरात वसलेल्या बोपे-कुंबले गावातील या वस्तीला जाण्यासाठी केवळ कच्चा रस्ता उपलब्ध आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड