पुणे - मुलीच्या साखरपुडा कार्यक्रमात केलेल्या खर्चावरून टीकेचे धनी बनलेले प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आणि त्याला कारणीभूत ठरलंय ते त्यांचं पुण्यातील कीर्तन.. पुण्यातील हडपसर परिसरात महाराजांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होता. मात्र आयोजकांनी यासाठी रस्ताच अडवल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे हडपसर परिसरात भली मोठी वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे संतप्त झालेल्या सहायक पोलीस निरीक्षक प्रविण जाधव यांनी अखेर त्यांना कार्यक्रम थांबवण्यास सांगितले. याचा एक व्हिडिओ सध्या समोर आलाय. सध्या पुण्यात महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहत आहेत. अनेक इच्छुक आपल्या प्रभागात नागरिकांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत. पुण्यातील काळेपडळ परिसरातही अशाच एका इच्छुक कार्यकर्त्याने इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचा आयोजन केलं होतं, आणि यासाठी चक्क वाहतुकीचा रस्ताच अडवण्यात आला होता. परिणामी रस्त्यावर भली मोठी वाहतूक कोंडी झाली. काही ठिकाणी तर वाहनांच्या रांगाच लागल्या. संतप्त झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी येत थेट महाराजांना उद्देशूनच महाराज कार्यक्रम बंद करा असं सांगितलं. पोलिस अधिकारी जाधव यांनी सांगितल्यानंतर महाराजांनीही काही वेळ कार्यक्रम बंद ठेवला.
{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/1582611979832122/}}}}समोर आलेल्या व्हिडिओतील एक पोलीस अधिकारी अतिशय तावातवाने रस्ता बंद करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला असे विचारताना दिसतोय. हे चालणार नाही रस्ता रिकामा करा असं म्हणत या पोलिस अधिकाऱ्यांनी चक्क महाराजांना उद्देशूनच महाराज कार्यक्रम बंद करा असा सज्जड दमच भरलाय. पोलिसांचा हा रुद्रावतार पाहून इंदुरीकर महाराजांनीही काही काळासाठी कार्यक्रम थांबवला. आणि त्यानंतर या पोलीस अधिकाऱ्याने हातात माईक घेत कार्यक्रम जर व्यवस्थित सुरू राहावा असं वाटत असेल तर रस्त्याची एक लाईन रिकामी करा असं म्हटलं. हडपसरपर्यंत रस्ता जाम झाला आहे. लोकांना जाण्या येण्यासाठी रस्ता रिकामा करा असं म्हणत या पोलीस कर्मचाऱ्यांनी विनंती केली. महाराजांचा कार्यक्रम चांगला आहे, मी सुद्धा बघितलाय, मी आणि महाराजांनी एकत्र जेवणही केलंय. त्यामुळे रस्ता मोकळा करावा असं म्हणत या पोलीस अधिकाऱ्यांनी विनंती केली. आणि त्यानंतर नागरिकांनीही पोलिसांच्या विनंतीला मान देत रस्ता रिकामा केला. आणि काही कारणे हा कार्यक्रम पुन्हा सुरू झाला.
Web Summary : Police stopped Indurikar Maharaj's kirtan in Pune's Hadapsar due to traffic congestion caused by organizers blocking the road. An officer requested the program be halted, urging attendees to clear the road for public access before the event resumed.
Web Summary : पुणे के हडपसर में सड़क बाधित होने से पुलिस ने इंदुरीकर महाराज का कीर्तन रोक दिया। एक अधिकारी ने कार्यक्रम रोकने का अनुरोध किया, और उपस्थित लोगों से कार्यक्रम फिर से शुरू होने से पहले सड़क खाली करने का आग्रह किया।