चाकण : ‘माझ्याविरोधात घात करण्याचा कट रचला गेला आहे. याबाबत काही माहिती आमच्याकडे आहे. मी सरकारकडून दिलेली सुरक्षा नाकारली आहे. माझे रक्षण माझा समाज करील.’ घातपात प्रकरणाच्या चौकशीत गंभीर आरोप समोर आल्याचा धक्कादायक खुलासा जरांगे यांनी केला. हा घातपात माजी मंत्री धनंजय मुंडेंनी करण्यास सांगितला असल्याचे त्यांनी म्हटले. ‘मग जालना जिल्ह्याच्या एसपीने गृहमंत्रालयाकडून त्यांच्या अटकेची परवानगी का घेतली नाही? कोणती शक्ती त्यांना वाचवत आहे?’ असा सवाल त्यांनी केला. तसेच, ‘अटक झालेल्या तीनही आरोपींची आणि आमचीही नार्को टेस्ट करा, आम्ही तयार आहोत. सत्य बाहेर यायला हवे. जर कारवाई झाली नाही, तर याचे परिणाम गंभीर होतील,’ असा सरकारला त्यांनी इशारा दिला.
मराठा क्रांती मोर्चाचे संघर्ष योद्धा व राज्यातील मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र राज्य समन्वयक मनोहर वाडेकर यांच्या मातोश्रीनंतर चाकण (ता. खेड) येथे भेट देऊन वाडेकर कुटुंबाला सांत्वन दिले. या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना जरांगे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. स्वतःवर झालेल्या घातपाताच्या कटापर्यंत अनेक मुद्द्यांवर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. याप्रसंगी कालिदास वाडेकर, अशोक मांडेकर, भगवान मेदनकर, विजय खरमाटे, प्रवीण करपे, बाबाजी कौटकर, कैलास पारधी, अरुण कुऱ्हे, नीलेश आंधळे, मोहन वाडेकर यांसह असंख्य मराठा कार्यकर्ते उपस्थित होते.
मराठा भवनची गरज
राज्यातील प्रत्येक तालुक्यातच नव्हे, तर प्रत्येक मोठ्या गावातही मराठा भवन असणे आवश्यक आहे. या मराठा भवनाच्या माध्यमातून विद्यार्थी त्यांच्या करिअरसाठी योग्य मार्गदर्शन मिळवू शकतील. शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले जातील आणि आर्थिक व सामाजिक मदत पोहोचवता येईल. मराठा समाजात प्रचंड क्षमता आहे; पण ती संघटित होणे आवश्यक आहे. मराठा भवन म्हणजे केवळ इमारत नाही, तर समाजाचे विश्वासार्ह केंद्र असते. सरकारने या बाबतीत मदत करायला हवी.
Web Summary : Manoj Jarange-Patil claims a plot to harm him, rejecting government security. He accuses ex-minister Dhananjay Munde and demands narco tests for truth. He warns the government of serious consequences if no action is taken and emphasizes the need for Maratha Bhavans.
Web Summary : मनोज जरांगे-पाटिल ने खुद पर हमले की साजिश का दावा किया, सरकारी सुरक्षा अस्वीकार की। उन्होंने पूर्व मंत्री धनंजय मुंडे पर आरोप लगाया और सच्चाई के लिए नार्को टेस्ट की मांग की। उन्होंने सरकार को गंभीर परिणाम भुगतने की चेतावनी दी और मराठा भवनों की आवश्यकता पर जोर दिया।