शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

यकृत प्रत्यारोपणानंतर पती-पत्नीचा मृत्यू; सह्याद्री हॉस्पिटलवर हलगर्जीपणाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 12:25 IST

- पत्नीने पतीसाठी यकृत दान केले होते. मात्र, उपचाराच्या नावाखाली दोघांचेही प्राण गेले.

पुणे : सह्याद्री हॉस्पिटलमध्ये यकृत (लिव्हर) प्रत्यारोपणानंतर पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बापू बाळकृष्ण कोमकर (वय ५४) आणि त्यांची पत्नी कामिनी बापू कोमकर (वय ४८) अशी मृतांची नावे आहेत. पत्नीने पतीसाठी यकृत दान केले होते. मात्र, उपचाराच्या नावाखाली दोघांचेही प्राण गेले.

गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या बापू कोमकर यांना यकृत प्रत्यारोपणाची गरज होती. आपल्या पतीचे प्राण वाचावेत यासाठी त्यांनी यकृत दान करण्याचा निर्णय घेतला. बुधवारी, दि.१३ ऑगस्ट रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, केवळ दोन दिवसांतच शुक्रवारी (दि.१५) बापू कोमकर यांचे निधन झाले, तर आठवडाभरानंतर शुक्रवारी दि.२२ ऑगस्ट रोजी कामिनी यांचाही मृत्यू झाला.या घटनेने कोमकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नातेवाइकांनी रुग्णालय प्रशासन आणि संबंधित डॉक्टरांवर हलगर्जीपणाचे गंभीर आरोप केले आहेत. योग्य ती काळजी घेतली असती तर दाम्पत्याचे प्राण वाचले असते, असा आरोप करून त्यांनी सह्याद्री हॉस्पिटलविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

सह्याद्री हॉस्पिटल हे अत्याधुनिक सुविधा व तज्ज्ञ डॉक्टरांसाठी ओळखले जाते. मात्र, पती-पत्नीचा लागोपाठ मृत्यू झाल्यामुळे रुग्णालयाच्या कार्यपद्धतीवर आणि डॉक्टरांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. यकृत प्रत्यारोपण ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असली, तरी या प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांकडे तक्रार दाखल झाली असून चौकशी सुरू आहे. पुढील कारवाईकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

शस्त्रक्रिया नियमांनुसारसह्याद्री हॉस्पिटल प्रशासनाने अधिकृत निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले,यकृत प्रत्यारोपण ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया आहे. या प्रकरणात रुग्ण एंड-स्टेज लिव्हर डिसीजमुळे उच्च-धोका असलेला होता. प्रोटोकॉलनुसार रुग्ण व कुटुंबीयांना सर्व धोके आधीच समजावून सांगण्यात आले होते. सर्व शस्त्रक्रिया वैद्यकीय नियमांनुसार पार पडल्या. मात्र, प्रत्यारोपणानंतर रुग्णाला ‘कार्डिओजेनिक शॉक’ आला व सर्व प्रयत्नांनंतरही त्याला वाचवता आले नाही. दाता शस्त्रक्रियेनंतर सुरुवातीला चांगल्या प्रकारे बरा होत होता.मात्र, सहाव्या दिवशी अचानक ‘हायपोटेन्सिव्ह शॉक’ आला व त्यामुळे ‘मल्टी ऑर्गन डिसफंक्शन’ झाले. प्रगत उपचार असूनही स्थिती नियंत्रणात आणता आली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडhospitalहॉस्पिटल