शहरं
Join us  
Trending Stories
1
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
2
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
3
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
4
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
5
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
6
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
7
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
8
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
9
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
10
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
11
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
12
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!
13
मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तर...! महायुती की स्वबळावर, निवडणुकीबाबत मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?
14
फायदेच फायदे! साखर नसलेला चहा आरोग्यासाठी गुणकारी, वजन कमी करण्यासाठी प्रभावी
15
ठरलं! 'या' तारखेला टीम इंडियाला मिळणार Asia Cup ट्रॉफी; पण नक्वी यांनी पुन्हा ठेवली खास अट
16
फ्री सेलिब्रेशन पार्टी अन् २ लाख रोख, फक्त 'ती' गर्भवती राहिली पाहिजे; हॉटेल मालकानं दिली ऑफर
17
Pratika Rawal Equals World Record : अंपायरच्या लेकीची कमाल! सर्वात जलद १००० धावांसह विश्वविक्रमाची बरोबरी
18
स्टाइल मारणं महागात पडलं...! रीलसाठी तोंडात फोडले ६ फटाके, ७ वा सुतळी बॉम्ब फुटला अन् १८ वर्षांच्या तरुणाचा अख्खा जबडाच उडाला!
19
Infosys, HCL Tech सह अनेक शेअर्समध्ये जोरदार रॅली; 'या' ५ कारणांमुळे आयटी स्टॉक्स चमकले
20
VIRAL VIDEO : 'आग' लावून हँडशेक! काय आहे 'Fire Handshake' ट्रेंड? डॉक्टरांनी दिली गंभीर चेतावणी!

आली... गवर आली.. सोनपावली आली..; गौराईचे जल्लोषात स्वागत; आज होणार गौरीपूजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 12:30 IST

- गणरायाच्या आगमनानंतर आता घरोघरी गौरींचे आवाहन; महिलांनी पारंपरिक वेशभूषा, दागदागिने परिधान करत केली पूजा आली

पुणे : शहरासह उपनगरात रविवारी (दि.३१) गौराईचे थाटामाटात आगमन झाले. सकाळपासूनच महिलांनी पूजा-अर्चेची लगबग सुरू केली होती. अंगणात रांगोळ्या, दारावर तोरणे, मंदिरे व घरांचे कोपरे फुलांनी सजवले होते. महिलांनी पारंपरिक नऊवारी, पैठणी, दागदागिने परिधान करत गौराईचे स्वागत केले.

गौराईच्या आगमनावेळी महिलांनी आरती, फुलोरा, नैवेद्य दाखवून त्यांचे स्वागत केले. पारंपरिक पद्धतीने फराळाचे पदार्थ लाडू, करंजी, चिवडा, शंकरपाळे, पुरणपोळी यांचा नैवेद्य दाखवला गेला. माहेरवाशीण म्हणून आलेल्या गौराईचे स्वागत घरातील सर्वांनी मानाने केले. प्रवेशद्वारापासूनच रांगोळीत लक्ष्मीच्या पावलांचे ठसे उमटवून गौराईचे आगमन मंगलमय करण्यात आले.

 गौरींच्या मूर्ती किंवा पाटावर बसवलेल्या मूर्तीसारख्या प्रतीकांना फुलांनी, वेलींनी सजवले गेले. सोन्याचे दागिने, रेशमी साड्या, चंदन-हळदीचा श्रृंगार यामुळे गौराईचे रूप उजळून निघाले होते. काही ठिकाणी महिलांनी एकत्र येऊन 'आली गवर आली सोनपावली आली' अशी गाणी म्हणत गौराईचे स्वागत केले. भाद्रपद शुद्ध पक्षात गौरींचे पूजन करण्याची परंपरा आहे. यंदा अनुराधा नक्षत्रावर गौरींचे आवाहन झाले आहे. 

गौरींचे विसर्जन मंगळवारी होणारज्येष्ठ नक्षत्रावर सोमवारी (दि. १) गौरीपूजन होणार आहे. कुटुंबाच्या आरोग्य, सुख-समृद्धी आणि ऐश्वर्यासाठी महिलांनी गौराईना अन्न, वस्त्र, अलंकार अर्पण करावेत, अशी परंपरा आहे, गौरींचे विसर्जन मंगळवारी (दि. २) मूळ नक्षत्रावर होणार आहे. रात्री ९.५७वाजेपर्यंत विसर्जनाची वेळ निश्चित करण्यात आली असून, त्या आधी महिलांनी गौराईना निरोप देण्याची तयारी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPune Ganpati Festivalपुणे गणेशोत्सव