शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

ओव्हरटेकिंगचा अतिरेक;सिमेंट ट्रक व गॅस टँकरचा भीषण अपघात; जीवितहानी टळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 15:03 IST

अपघातानंतर तातडीने वाघोली येथील पीएमआरडीए अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. गॅस टँकरमुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन अग्निशमन गाडीने प्रसंगावर नियंत्रण मिळवले.

उरुळी कांचन (ता. हवेली) : कोलवडी येथील उंद्रे वस्ती परिसरात मंगळवारी (दि. २६ ऑगस्ट) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास सिमेंट भरलेला ट्रक व भारत पेट्रोलियमचा एलपीजी गॅस टँकर यांच्यात जोरदार अपघात झाला. या भीषण अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली; मात्र गॅस टँकर चालक चंद्रशेखरन पी. यांना डोक्याला गंभीर दुखापत होऊन चार टाके घालावे लागले.अधिकच्या माहितीनुसार, त्रिमूर्ती ट्रान्सपोर्ट एजन्सीचा (एमएच १२ डब्ल्यूएक्स ६७०६) सिमेंट भरलेला ट्रक थेऊर वरून केसनंदकडे जात होता. ओव्हरटेकिंग करताना तो समोरून येणाऱ्या भारत पेट्रोलियमच्या (एमएच ०४ केएफ ९४५५) एलपीजी गॅस टँकरवर आदळला. या धडकेत दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.अपघातानंतर तातडीने वाघोली येथील पीएमआरडीए अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. गॅस टँकरमुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन अग्निशमन गाडीने प्रसंगावर नियंत्रण मिळवले. अग्निशमन कर्मचारी प्रशांत अडसूळ, शुभम चौधरी, अभिषेक पवार, शुभम पोटे तसेच आपत्ती व्यवस्थापन पथकातील राहुल शिंदे व राजेंद्र फुंदे यांनी तत्परतेने हस्तक्षेप करून टँकर सुरक्षितपणे रस्त्याच्या कडेला हलवला. याचबरोबर लोणीकंद पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. नागरी वस्तीमध्ये झालेल्या या अपघातामुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र प्रशासन व स्थानिक यंत्रणांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAccidentअपघात