शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्योत्तर काळानंतरही जिल्ह्यातील धनगरवाडे ओढ्यापलीकडेच;साकवावरून जीवघेणा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 15:10 IST

वेल्हे तालुक्यातील घिसर गावातील चित्र; पुलाची मागणी करूनही दुर्लक्ष

- शंकर ढेबे 

पानशेत : स्वातंत्र्योत्तर काळानंतरही वेल्हे, भोर, मुळशी तालुक्यातील अनेक धनगरवाडे हे ओढ्या पलीकडे असल्याने येथील धनगर बांधव धोकादायक नदीपात्रातून प्रवास करत असल्याचे भयावह चित्र समोर आले आहे. असेच वेल्हे तालुक्यातील घिसर गावाच्या हद्दीतील कचरे वस्तीतील ग्रामस्थांना कानंदी नदीवरील लाकडाच्या साकवावरून जीव मुठीत घेऊन जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.

सगळीकडे पावसाळा सुरू झाला असून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने ओढे, नदी, नाले हे दुथडी भरून वाहत आहेत. वेल्हे तालुक्यातील काही धनगर वस्त्यांना ये-जा करण्यासाठी ओढे, नदी पात्रातून रस्ता असल्याने ग्रामस्थ जीव मुठीत घेऊन वाहत्या पाण्यातून जात आहेत.

घिसर येथील कचरे वस्ती व हिरवे वस्ती ही शासनाकडे अनेक वर्षांपासून पुलाची मागणी करत आहेत. परंतु त्यांच्या मागणीला प्रशासनाकडून केराची टोपली दाखवली जात आहे. येथील शाळकरी मुले दररोज अशा धोकादायक साकवावरून जीवघेणा प्रवास करत आहेत. तर गरोदर माता, आजारी व्यक्तींना या पुलावरून तारेवरची कसरत करत दवाखाना पकडावा लागत आहे. प्रशासन गप्पनागरिकांना कामधंद्यासाठी याच पुलावरून जावे लागत असल्याने यांच्या पाचवीला संघर्ष पुरला आहे. प्रशासन नागरिकांचा बळी गेल्यावर जागे होणार का? असा सवाल येथील नागरिक रघुनाथ कचरे यांनी केला आहे. दोन दिवसांपूर्वी मुळशीतील वेगरे गावातील धनगरवाड्यावरचे कोंडिबा मरगळे हे नदीपात्रातून घरी जात असताना वाहून गेल्याने मृत्यू पावले अशा अनेक घटना भोर-वेल्हा-मुळशीतील धनगर वस्त्यांवर घडत असताना प्रशासन मात्र हाताची घडी अन् तोंडावर बोट ठेवून गप्प आहे. मोठ्या दुर्घटनाची शक्यतालाकडी पूल असल्याने तो कधीही तुटून पडू शकतो. अशा वेळेस या साकवावरून प्रवास करणारे नागरिक रौद्र रूप धारण केलेल्या कानंदी नदीत पडून थेट मृत्यूच्या दारात जाऊ शकतात. लाकडाच्या साकवाऐवजी लोखंडी साकव पावसाळ्यापूर्वी उभारणे आवश्यक आहे. पावसाळा संपल्यानंतर चांगल्या दर्जाचा पूल उभारणे आवश्यक आहे.

मागणीला केराची टोपलीगेल्या कित्येक वर्षांपासून प्रशासनाकडे ग्रामस्थ मागणी केली करत आहेत परंतु फक्त आश्वासन मिळत आहेत. परंतु, यावर ठोस निर्णय होत नसल्याने आमच्या मागणीला प्रशासन व लोकप्रतिनिधीकडून केराची टोपली दाखवली जात असल्याचे ग्रामस्थ बोलत आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड