शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

8 वर्षांच्या आरिष्काने आईसोबत सर केला किलीमंजारो;आफ्रिकेचा सर्वोच्च शिखर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 11:11 IST

४ जून रोजी तंजानियासाठी रवाना झाल्यानंतर त्यांनी ५ जूनला लेमोषो मार्गाने ८ दिवसांचा ५१ किमी लांबीचा अत्यंत आव्हानात्मक ट्रेक सुरू केला.

- विशाल सातपुतेकोथरूड : पुण्यातील बावधन भागातील केवळ ८ वर्षांची आरिष्का लढ्ढा हिने आपल्या आई डिंपल लढ्ढासोबत आफ्रिकेच्या सर्वोच्च शिखर माउंट किलिमंजारो (१९,३४१ फूट) यशस्वीपणे चढाई करत विक्रम प्रस्थापित केला आहे. ११ जून रोजी आरिष्का आणि डिंपल या मायलेकींनी शिखरावर पाऊल ठेवत इतिहास रचला.४ जून रोजी तंजानियासाठी रवाना झाल्यानंतर त्यांनी ५ जूनला लेमोषो मार्गाने ८ दिवसांचा ५१ किमी लांबीचा अत्यंत आव्हानात्मक ट्रेक सुरू केला.

खडतर चढाईनंतर ११ जूनच्या मध्यरात्री १२ वाजता त्यांनी बाराफू बेस कॅम्पहून अंतिम शिखर चढाईस सुरुवात केली. पौर्णिमेच्या चांदण्यात १० ते -१५ डिग्री सेल्सिअस या कडक थंडीमध्ये, थकवा आणि झोपेच्या अभावातही आरिष्का आणि डिंपलने आपल्या जिद्दीच्या जोरावर किलिमंजारोच्या उहुरू पीकवर पाऊल ठेवले.

शिखरावर पोहोचल्यानंतर त्यांनी भारत सरकार आणि भारतीय सशस्त्र दलाचा सन्मान करणारा ‘ऑपरेशन सिंदूर’ चा बॅनर गर्वाने फडकावला. कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्या नेतृत्वात चालणाऱ्या या विशेष मोहिमेला समर्पित ही चढाई वैयक्तिक आणि देशाभिमानाने भारलेला क्षण होता. ती आशिया, युरोप आणि आता आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर गाठणारी जगातील सर्वांत तरुण पर्वतारोहकांपैकी एक ठरली आहे. आरिष्का आणि डिंपल लढ्ढाच्या या यशामुळे केवळ पुणेच नाही, तर संपूर्ण भारताचा अभिमान उंचावला आहे. जिद्द, चिकाटी आणि स्वप्नांची उंची गाठण्यासाठी वयाची मर्यादा नसते, हे त्यांनी सिद्ध केले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड