शहरं
Join us  
Trending Stories
1
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
2
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
3
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
5
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
6
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
7
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
8
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
9
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
10
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
11
Delhi Blast: हल्ल्याच्या १० दिवस आधी कुठे होती 'ती' i20 कार? मोठी माहिती उघड, तपासाला वेग
12
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?
13
भाजप निरीक्षकांनी दिलेल्या नावांवर होणार शिक्कामोर्तब, नगराध्यक्ष, नगरसेवकांची ९५ टक्के नावे फायनल; संघटनेवर विश्वास
14
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
15
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
16
"ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय"; तुळजापूरातील आरोपीच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र
17
१३९ दिवस मंगळ अस्त: ७ राशींचे मंगल होईल, बक्कळ लाभ; इच्छा पूर्ण, २ राशींना अमंगलाचे संकेत!
18
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
19
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
20
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली

दसऱ्या दिवाळीत सुकामेवा स्वस्त होऊन गोडी वाढणार; खजूर, बदाम, पिस्ता प्रतिकिलो ४० ते १०० रुपयांनी स्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 15:07 IST

- उद्यापासून खजूर, बदाम, पिस्ता प्रतिकिलो ४० ते १०० रुपयांनी स्वस्त

पुणे : नवरात्र उत्सवात देवीची घटस्थापना सोमवारी (दि. २२) होत आहे. त्यानिमित्ताने सोमवारपासून देशात केंद्र सरकारने जीएसटीचे दर कमी केले आहे. यामध्ये ड्रायफ्रूट सुकामेव्याचे दर १२ टक्क्यांवरून जीएसटी ५ टक्के करण्यात आले आहे.

यामुळे खजूर, बदाम, पिस्ता, अंजीर, आक्रोड, जर्दाळू आदी सुकामेवा प्रतिकिलो ४० ते १०० रुपयांनी स्वस्त होणार आहे. नवरात्र उत्साहात मोठ्या प्रमाणात उपवास केला जातो. सर्वसामान्य ग्राहकांना नवरात्रीच्या निमित्ताने सुकामेवा स्वस्त झाल्याने सामान्यांच्या आवाक्यात दर आले आहेत. त्यामुळे सामान्यांची दिवाळी यंदा गोड होणार आहे. नवरात्र उत्सवात नऊ दिवस उपवास असल्याने शहर व उपनगरांतून ड्रायफ्रूट सुकामेव्याला मागणी अधिक सर्वसामान्य ग्राहकांना ड्रायफ्रूटचे दर कमी झाल्याने दिलासा मिळणार आहे.

- नवरात्रात खजुराला मागणी जास्त : खजूर ३५० वरून ३१५ रुपये प्रतिकिलो

- नवरात्रोत्सवात नऊ दिवस उपवासात ड्रायफ्रूटमध्ये खजुराची मागणी अधिक असते. यामध्ये पिवळ्या व काळ्या खजुरांना जास्त मागणी असून ते सामान्य नागरिकांना इतर फळां पेक्षा परवडत आहे. उपवासात खजुरापासून जास्त कॅलरीज मिळतात आणि हे खाल्याने जास्त थकवा वाटत नाही. त्यामुळेच याला जास्त मागणी आहे आणि सामन्यांच्या आवाक्यात असल्याने नागरिक खजुरांना पसंती देत आहेत. यंदा खजूर किलोमागे ४० रुपयांनी स्वस्त झाला आहे.

सोमवार (दि. २२) सप्टेंबरपासून असे होणार दर

प्रकार आताचे दर प्रतिकिलो आणि जीएसटी दर कमी दर

खजूर ३३६                        ३१५

बदाम ८९६                        ८४०

पिस्ता १२५० ११५०

आक्रोड १२५० ११५०

अंजीर। १५०० १३००

खारीक २८० २५०

जर्दाळू ५०० ४०० 

- इराण, अफगाणिस्तान या देशातून खजुरांची आयात केली जाते. मागील वर्षाच्या तुलनेत खजुरांच्या भावात २५ टक्के घट झाली आहे. यंदा मात्र केंद्र सरकारने १२ टक्क्यांवरून ५ टक्के जीएसटी केल्याने ड्रायफ्रूट दरात घट झाली असून ३६० चा खजूर २७० पर्यंत आला आहे. यामुळे सामन्यांकडून मागणी वाढणार असून हे दर दसरा, दिवाळीमध्येही असेच राहणार असून सामान्यांची दिवाळी गोड होणार आहे - नवीन गोयल ड्रायफ्रूट व्यापारी व दी पूना मर्चंट चेंबर सदस्य नवरात्र उत्साहात : आमच्या घरामध्ये नऊ दिवस उपवास केला जातो. यावर्षी उपवास केल्यामुळे, ड्रायफ्रूट स्वस्त मिळाल्याने दिवाळी गोड होणार आहे.  - नकुल जोशी उपहासक

 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड