शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

पुरंदर तालुका जिल्हा परिषदेच्या,पंचायत समितीच्या गट-गण रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 16:26 IST

- जिल्हा परिषदेचे चार गट आणि पंचायत समितीचे आठ गण होते. नव्या प्रभाग रचनेनुसार जि. प.चे गट आणि पं. स.च्या गणांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

नीरा : तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणांची प्रारूप प्रभाग रचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी नुकतीच जाहीर केली आहे. जिल्हा परिषदेचे चार गट आणि पंचायत समितीच्या आठ गणांमध्ये ही निवडणूक होणार आहे. दरम्यान, या प्रारूप गट-गण रचनेवर नागरिकांना सोमवारी (दि. २१ जुलै)पर्यंत जिल्हाधिकारी यांच्याकडे हरकती आणि सूचना नोंदवता येणार आहेत.यापूर्वी जिल्हा परिषदेचे चार गट आणि पंचायत समितीचे आठ गण होते. नव्या प्रभाग रचनेनुसार जि. प.चे गट आणि पं. स.च्या गणांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. दोन वर्षांपूर्वी झालेल्या प्रभाग रचनेत काही गट व गणातील गावांचा समावेश इतर गट/गणात झाला होता, ज्यामुळे इच्छुकांना मोठी अडचण झाली होती. परंतु आता जुन्या रचनेप्रमाणेच गट-गण रचनेचे प्रारूप प्रसिद्ध झाल्याने ग्रामीण भागात कोणत्या गटात-गणात कोणती गावं येतील, हे निश्चित झाले आहे. यामुळे इच्छुकांनी मोर्चेबांधणी करणे सुरू केले आहे.

पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद गट व गणानुसार समाविष्ट गावांची यादी१. गराडे-दिवे जिल्हा परिषद गटातील गराडे गण : भिवरी, पठारवाडी, आस्करवाडी, थापेवाडी, वारवडी, गराडे, सोमुर्डी, कोडीत बुद्रुक, बोपगाव, चांबळी, हिवरे, कोडीत खुर्द.दिवे गण : झेंडेवाडी, दिवे, जाधववाडी, काळेवाडी, पवारवाडी, सोनोरी, आंबोडी, वनपुरी, उदाचीवाडी, गुऱ्होळी, सिंगापूर, वाघापूर, आंबळे, टेकवडी, कुंभारवळण.२. बेलसर - माळशिरस जिल्हा परिषद गटातील माळशिरस गण : रानमळा, कोथळे, धालेवाडी, पिंपरी, नाझरे सुपे, नाझरे क. प., माळशिरस, नायगाव, पांडेश्वर, पोंढे, राजुरी, पिसे, रिसे, मावडी सुपे.बेलसर गण : भोसलेवाडी, खळद, शिवरी, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, वाळुंज, तक्रारवाडी, बेलसर, निळुंज, पारगाव, राजेवाडी, पिसर्वे.३. भिवडी - मांडकी जिल्हा परिषद गटातील भिवडी गण : केतकावळे, कुंभोशी, घेरापुरंधर, मिसाळवाडी, देवडी, चिव्हेवाडी, पूर, पोखर, काळदरी, बांदलवाडी, पानवडी, बहीरवाडी, दवणेवाडी, धनकवडी, मांढर, हरगुडे, पांगारे, खेंगरेवाडी, शिंदेवाडी, बोऱ्हाळवाडी, पिंपळे, सुपे खुर्द, भिवडी.मांडकी गण : वीर, माळवाडी, समगीरवस्ती, लपतळवाडी, हरणी, मांडकी, पिसुर्टी, जेऊर.४. नीरा - कोळविहिरे जिल्हा परिषद गटातील कोळविहिरे गण : साकुर्डे, पिंगोरी, दौंडज, जेजुरी ग्रामीण, कोळविहिरे, जवळार्जुन, मावडी कडेपठार, नवळी, राख, कर्नलवाडी, गुळुंचे.नीरा शिवतक्रार गण : वाल्हे, वागदरवाडी, आडाचीवाडी, सुकलवाडी, पिंपरे खुर्द, थोपटेवाडी, नीरा शिवतक्रार.

मागील अडीच वर्षांपूर्वी आणि वर्तमानकाळात नव्याने राजकीय पक्षांचे जिल्हा पातळीवरील पदाधिकारी, तसेच तीन माजी आमदार व बहुतांश माजी जिल्हा परिषद सदस्यांनी आपले जुने पक्ष सोडून नव्याने पक्ष बांधले आहेत. या नव्या पक्षांमध्ये आधीच अनेक पदाधिकारी होते आणि आता नव्याने दिग्गजांचा प्रवेश झाल्याने, कोणाला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची उमेदवारी द्यायची आहे, याबाबत पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना मोठी घामछटा सहन करावी लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मोठ्या पक्षासाठी सर्व जागांवर ताकदीचे उमेदवार मिळवणे कठीण होणार आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड