शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

उजनी धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग निम्म्याने कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 19:37 IST

-  पुणे शहरासह घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसाचे पाणी येत असल्याने उजनी धरण आधीच शंभर टक्क्याहून अधिक भरले होते

इंदापूर  : सोमवारच्या तुलनेत दौंडहून येणा-या विसर्गात घट झाल्याच्या तुलनेत धरणातून नदीत सोडण्यात येणा-या पाण्याचे प्रमाण ही निम्म्याने कमी करण्यात आले आहे. मंगळवारी ( दि.१६) सायंकाळी उजनी धरणाच्या सांडव्यातून ५५ हजार क्युसेक्स क्षमतेने नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. तरी ही नदी काठांवरील गावे व ग्रामस्थांना सतर्क रहाण्याचा प्रशासनाचा इशारा कायम आहे.

पुणे शहरासह घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसाचे पाणी येत असल्याने उजनी धरण आधीच शंभर टक्क्याहून अधिक भरले होते. रविवारच्या पावसाने कहर केल्यानंतर धोकादायक पातळीच्या वर पाणी जावून अघटित घटना घडू नये म्हणून सोमवारी सकाळपासून उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात सोडण्यात येणा-या विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ करत १ लाख क्यूसेक क्षमतेने नदीत पाणी सोडण्यात आले.

मंगळवारी दौंडकडून उजनी धरणाकडे येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात ११ हजार ५७७ ने घट झाली. २२ हजार ४२३ क्युसेक्सने धरणात पाणी येत असल्याने सायंकाळी सहा वाजता एक लाख क्यूसेक ऐवजी ५५ हजार क्युसेक्सने सांडव्यातून नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात झाली. सांडव्याबरोबरच पॉवर हाऊससाठी १ हजार ६०० क्युसेक्स,सिना माढा उपसा सिंचन योजनेसाठी १८० क्युसेक्स,बोगद्यातून २०० क्युसेक्स व मुख्य कालव्याद्वारे 600 क्युसेक्स क्षमतेने पाणी सोडून उजनी धरण धोक्याच्या पातळीबाहेर ठेवण्याचे काम उजनी धरण व्यवस्थापन समिती करत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नदीपात्रात जावू नये. सखल भागातील जनावरे व साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यावे असे आवाहन उजनी धरण व्यवस्थापन विभागाने केले आहे. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड