शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शिवसृष्टी स्मारकाच्या गेटवर लघुशंका प्रकरणी दाम्पत्याविरोधात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 14:32 IST

या घटनेविरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

पुणे - शहरातील आंबेगाव बुद्रुक परिसरातील शिवसृष्टी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या गेटवर लघुशंका केल्याच्या प्रकरणी एक दाम्पत्य अडचणीत आले आहे. या घटनेविरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

तक्रार दाखल करणारे नयनाथ तुकाराम अमराळे (वय 23) हे शिक्षण घेत असून, त्यांनी सांगितल्यानुसार, शनिवारी पहाटे सुमारास ते आणि त्यांचे रूममेट अभिजीत सितापुरे हे नवले ब्रिजवरून घरी परतत होते. यादरम्यान, शिवसृष्टीच्या प्रवेशद्वाराजवळ दोन चारचाकी गाड्या उभ्या असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यापैकी एका गाडीजवळ एक पुरुष व्यक्ती सूचना फलकाजवळ लघुशंका करताना दिसला, तर त्यांच्यासोबत एक महिला उभी होती.ही घटना रेकॉर्ड केल्याचे अक्षय गायकवाड या स्थानिक तरुणाने सांगितले. त्यानंतर अमराळे आणि त्यांच्या मित्राने संबंधित व्यक्तींना विचारणा केली असता, त्या पुरुषाने स्वतःचे नाव अमोल अरुण कुलकर्णी (वय 59, धायरी, पुणे) व त्यांच्या सोबत असलेल्या महिलेचे नाव पत्नी स्नेहा अमोल कुलकर्णी (वय 57) असल्याचे सांगितले.

तक्रारदाराने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, या दोघांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. घटनास्थळाची माहिती मिळाल्यानंतर स्थानिकांनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आणले. सहायक पोलीस निरीक्षक मिथुन परदेशी हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड