शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

अभय योजनेला थंड प्रतिसाद, १५ दिवसांत ६५ कोटी जमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 12:28 IST

पुणे : पुणे महापालिकेने मिळकत कर थकबाकीदारांसाठी १५ नोव्हेंबरपासून अभय योजना सुरू केली आहे. गेल्या १५ दिवसांत ११ हजार ...

पुणे :पुणे महापालिकेने मिळकत कर थकबाकीदारांसाठी १५ नोव्हेंबरपासून अभय योजना सुरू केली आहे. गेल्या १५ दिवसांत ११ हजार १९१ मिळकतधारकांनी ६५ कोटी ४१ लाख ९५ हजारांचा मिळकत कर भरला आहे. पालिकेच्या अपेक्षेनुसार हे उत्पन्न नसले, तरी नोव्हेंबरमधील अभय योजनेमुळे आतापर्यंत एकूण ७२ कोटी ८२ लाख ५५ हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. मिळकत कर विभागास २०२५-२६ या आर्थिक वर्षात ३ हजार कोटींचे उद्दिष्ट दिले असून आतापर्यंत १ हजार ८०० कोटींचा महसूल पालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे.

शहरात सुमारे साडेसहा लाख मिळकत कर थकबाकीदार असून, त्यांची थकबाकी आणि त्यावरील दंडाची रक्कम मिळून थकबाकी १३ हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे. दंडाच्या वाढत्या रकमेमुळे दर चार वर्षांनी ही थकबाकी दुपटीने वाढत आहे. त्यामुळे अभय योजना राबविली आहे. यापूर्वी महापालिकेने २०१६ नंतर चार वेळा अभय योजना राबविली होती. त्या योजनेतील लाभार्थींना यावेळी वगळण्यात आले आहे. त्यामुळे साडेचार लाख मिळकतधारकांना या योजनेचा फायदा होऊ शकतो. या योजनेत थकबाकीवरील दंडाच्या रकमेत ७५ टक्के सवलत देण्यात आली आहे. ही योजना १५ जानेवारीपर्यंत लागू राहणार आहे. या माध्यमातून पालिकेस साडेचारशे कोटींची उत्पन्न अपेक्षित आहे. त्या तुलनेत पालिकेला प्रतिसाद कमी मिळाल्याचे दिसते. 

१ लाख ४० हजार मिळकतधारकांना पुन्हा मिळणार लाभ

अभय योजनेत यापूर्वी (वर्ष २०१५-१६, २०१६-१७, २०२०-२१ व २०२१-२२) ज्या मिळकतधारकांनी लाभ घेतला आहे, त्या मिळकतधारकांना या लाभ दिला जाणार नाही, असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले होते. मात्र आता यापूर्वी योजनेत लाभ घेतलेल्या मिळकतधारकांना देखील या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. या बाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. यापूर्वी योजनांचा लाभ घेतलेले १ लाख ४० हजार ४३७ मिळकतधारक आहेत. त्यांना १ डिसेंबरपासून लाभ देणे सुरु केले जाणार आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडGovernmentसरकारPuneपुणे