शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आई धुणं-भांडी करते, बाप शेतकरी;जिद्द, चिकाटी अन् कठोर परिश्रमाच्या जोरावर शिल्पा बनली सीए

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 18:54 IST

शिल्पाचे वडील राजेंद्र कातुर्डे शेती करतात, तर आई सुशिला घरकाम आणि धुण्याभांड्याचे काम करून कुटुंब चालवते. शिल्पाची आई सहावीपर्यंत आणि वडील दहावीपर्यंत शिकले आहेत.

पानशेत - कोंढावळे बुद्रुक (ता. राजगड) येथील शेतकरी कुटुंबातील शिल्पा राजेंद्र कातुर्डे हिने कठीण परिस्थितीवर मात करत सीए (चार्टर्ड अकाउंटंट) ही अत्यंत कठीण समजली जाणारी परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली. जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर शिल्पाने हे स्वप्न साकारले.शिल्पाचे वडील राजेंद्र कातुर्डे शेती करतात, तर आई सुशिला घरकाम आणि धुण्याभांड्याचे काम करून कुटुंब चालवते. शिल्पाची आई सहावीपर्यंत आणि वडील दहावीपर्यंत शिकले आहेत. मात्र मुलगी हुशार असल्याचे लक्षात घेऊन तिच्या शिक्षणात कधीच अडथळा येऊ दिला नाही. शिल्पाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोंढावळे बुद्रुक येथून शिक्षणाची सुरुवात केली. पुढे सीए होण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून तिने लायब्ररीत अभ्यास केला, घरकाम आणि शेतकामात आईवडिलांना मदत केली आणि रात्री उशिरापर्यंत अभ्यास करून आपले स्वप्न प्रत्यक्षात उतरवले.आपल्या यशाबद्दल शिल्पा म्हणाली, आई-वडील आणि काका संदिप कातुर्डे यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार केला होता. पहिल्या प्रयत्नात प्राथमिक परीक्षा पास झाले, पण पुढील टप्प्यात खूप मेहनत घ्यावी लागली. सातत्य, आईवडिलांचे आशीर्वाद आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यांच्या जोरावरच हे यश मिळाले. शिल्पाच्या या यशामुळे कोंढावळे गावासह संपूर्ण राजगड तालुक्यात कौतुकाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडexamपरीक्षाchartered accountantसीए