शहरं
Join us  
Trending Stories
1
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
2
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
3
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
4
अंबरनाथ, बदलापूर तो झाँकी हैं, कल्याण-डोंबिवली बाकी हैं! शिंदेसेनेला खिंडीत पकडण्याची खेळी
5
सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसले, नियंत्रण रेषेवर घुसखोरीची भीती, सुरक्षा दल हाय अलर्टवर
6
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
7
बाळासाहेब असते तर.. त्यांना आनंद झाला असता; पहिल्यांदाच राज यांनी बोलून दाखविली मनातील भावना
8
"मुंबईचे पुन्हा बॉम्बे करण्याचा डाव"; शिवाजी पार्कवरील सभेत उद्धव ठाकरेंचा आरोप
9
पुण्यातून निवडणूक लढवणार का?, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
10
"...नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे"; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले
11
IND vs NZ : ना अनुष्का ना वामिका! जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी थेट ‘या’ व्यक्तीकडे पाठवतो विराट, म्हणाला…
12
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
13
WPL 2026 : अनुष्का शर्मानं 'फ्लाइंग शो'सह जेमीचा षटकार रोखला! अखेरच्या षटकात सोफीनं सामना फिरवला
14
कोणी अभिनेता, कोणी लावणी डान्सर तर कोणी राजकारणी; एका क्लिकवर वाचा 'बिग बॉस मराठी ६'मधील स्पर्धकांची संपूर्ण यादी
15
IND vs NZ : कोहली-गिलची फिफ्टी; वॉशिंग्टन लंगडत खेळला! KL राहुलनं सिक्सर मारत जिंकून दिला रंगतदार सामना
16
'अकबराच्या बापाचा बाप...', नाशिक कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य
17
Virat Kohli Nervous Nineties Record : किंग कोहलीनं धमाका केला; पण शतक अवघ्या ७ धावांनी हुकलं अन्...
18
BMC Elections 2026 : 'ठाकरे ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे, विचार संपत नसतो'; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
19
'सोनावणे वहिनी' फेम सोशल मीडिया स्टार करण सोनावणेची 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात धमाकेदार एन्ट्री
20
Virat Kohli Record : किंग कोहलीचा 'फिफ्टी प्लस'चा पंच; संगकाराचा महारेकॉर्डही मोडला आता फक्त...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे प्रभाग सेफ, काही माजी नगरसेवकांचे प्रभाग अनसेफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 14:18 IST

- राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अनेकांचे प्रभाग तोडले,केली कोंडी; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे प्रभाग सेफ

- राजू हिंगे पुणे : महापालिकेच्या प्रारूप प्रभागरचना भाजपचे पालिकेतील माजी पदाधिकारी आणि नेत्यांना अनुकूल झाली आहे. मात्र, भाजपच्या काही माजी नगरसेवकांचे प्रभाग तोडल्यामुळे अनसेफ झाले आहेत. नगरविकास खाते शिवसेनेच्या शिंदे गटाकडे आहे. त्यामुळे शिंदेसेनेच्या शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची प्रभागरचना सेफ झाली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकांचे प्रभाग तोडले आहेत. त्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची कोंडी झाली आहे.

पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचना आज जाहीर करण्यात आली. महापालिकेची प्रभागरचना करताना भाजपने विश्वासात न घेता परस्पर प्रभागरचना करून घेतल्याचा आरोप शिवसेनेच्या शिंदेसेनेने केला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खात्याचा कारभार असल्याने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रभागांमध्ये काही बदल करत शिवसेनेला फायद्याचे ठरतील असे काही प्रभाग झाले आहेत. महापालिकेत भाजपचे माजी पदाधिकारी प्रभागरचनेसाठी प्रयत्नशील होते. त्यांनी प्रभागरचना अनुकूल करून घेतली आहे. पण भाजपचे काही माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते यांना प्रभागरचना अनुकूल नाही. त्यामुळे भाजपचे काही कार्यकर्ते नाराज झाले आहेत. प्रभागरचनेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या काही पदाधिकाऱ्यांचे प्रभाग सेफ झाले आहेत. मात्र, अनेक माजी नगरसेवकांचे प्रभाग तोडले आहेत. त्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे काही माजी नगरसेवक नाराज झाले आहेत.

 भाजपात प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांचे प्रभाग अनसेफच

पुणे महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेत भाजपमध्ये अन्य पक्षांतून प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांचे प्रभाग हे अनसेफ झाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. 

महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या प्रभागाची मोडतोडप्रारूप प्रभागरचनेत महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या प्रभागाची अक्षरश: मोडतोड करण्यात आली. त्यात कॉग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह माजी नगरसेवकांच्या प्रभाग तोडले आहेत.

 भाजप आणि शिंदे सेनेच्या शीतयुद्धाचा अजितपवार गटाला फटका

पालिकेेच्या प्रारूप प्रभाग रचनेवरून भाजप आणि शिवसेनेच्या शिंदेगटाचे शीतयुद्ध सुरू होते. त्यामुळे राज्याच्या नगरविकास विभागाने प्रभागरचना निवडणूक आयोगाकडे उशिरा सादर केली. त्यात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याची प्रभागरचना अनुकूल करण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकांचे प्रभाग तोडले. त्यामुळे भाजप आणि शिंदे सेनेच्या शीतयुद्धाचा अजित पवार गटाला फटका बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. 

कसबा नाव वगळलेपुणे महापालिकेच्या प्रारूप प्रभागरचनेत कसबा हे नाव काेणत्याही प्रभागाला देण्यात आलेले नाही. पुणे म्हणजे कसबा पेठ असे समीकरण आहे. त्यामुळे कसबा हे नाव नसल्यामुळे या भागातील नागरिक नाराज झाले आहेत. याउलट शिवाजीनगर, पुणे स्टेशन, पर्वती, हडपसर ही विधानसभा मतदारसंघांची नावे प्रभांगाना आली आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रElectionनिवडणूक 2024pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड