शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदर विमानतळ मोबदला पॅकेजची घोषणा लवकर करा;शेतकऱ्यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 16:07 IST

- भूसंपादनाबाबत हरकतींवरील सुनावणी पूर्ण; मोजणीनंतरच ठरेल मोबदला

पुणे : पुरंदर विमानतळासाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादनाबाबत सात गावांमधील शेतकऱ्यांकडून जिल्हा प्रशासनाच्या वतीने हरकती, सूचना मागविण्यात आल्या होत्या. या हरकतींवरील सुनावणी पूर्ण झाली असून, काही शेतकऱ्यांनी विमानतळाला आपला विरोध कायम ठेवला असला तरी काही शेतकऱ्यांनी भूसंपादनाच्या मोबदल्याचे पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर संपादनासाठी जमीन देण्याबाबत शेतकरी निर्णय घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

प्रस्तावित पुरंदर विमानतळासाठी तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव या सात गावांमधून सुमारे दोन हजार ६७३ हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने शेतकऱ्यांना भूसंपादनासाठी ३२ (२)च्या नोटीस देण्यात आल्या. या नोटिसीनंतर शेतकऱ्यांना हरकती सूचना देण्यात सांगण्यात आले होते. त्यानुसार या सर्व गावांतील शेतकऱ्यांकडून दोन हजार ५२ हरकती नोंदविण्यात आल्या होत्या. त्यावर भूसंपादनासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांकडून या सुनावणी घेण्यात आल्या. या सुनावणीला ९ जूनपासून सुरुवात झाली होती.सुमारे महिनाभर चाललेल्या सुनावणीदरम्यान अनेक शेतकऱ्यांनी विमानतळाला पाठिंबा दर्शवला. त्यासाठी मोबदला अजून ठरलेला नसल्याने सरकारने भूसंपादनाच्या मोबदल्यात पैशांसोबत जमीन द्यावी. तसेच या पॅकेजची घोषणा लवकर करावी, अशी मागणीही केली आहे. त्यानंतर शेतकरी भूसंपादन करण्यास तयार होतील, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. तर काही शेतकऱ्यांनी भूसंपादनाला विरोध कायम ठेवला आहे. कुठल्याही परिस्थितीत जमिनी सरकार देणार नसल्याचे सांगितले. सुनावणीनंतर जिल्हा प्रशासन आणि सरकार काय भूमिका घेणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

भूसंपादन, तसेच जमिनीचा मोबदला ठरविण्यासाठी त्या जमिनीची मोजणी आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने ३ मे रोजी जमिनीचे ड्रोन सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, गावकऱ्यांनी आंदोलन करीत हा प्रयत्न हाणून पाडला. त्यानंतर सर्वेक्षण थांबविण्यात आले होते. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठक घेऊन सर्वमान्य तोडग्यासाठी शेतकऱ्यांनी पॅकेज सुचवावे किंवा राज्य सरकार स्वतंत्र पॅकेज देईल, असे स्पष्ट केले होते.

मोबदल्याबाबत हे प्रश्न अनुत्तरित

मोबदला किती आणि कसा दिला जाईल, पुनर्वसनाची योजना असेल का, मोजणी कधी होईल, असे प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केले जात आहेत. आता भूसंपादनासाठी त्या जागेचे सर्वेक्षण आणि मोजणी करण्याची आवश्यकता आहे. या सुनावणीनंतर प्रशासन मोजणीला सुरुवात करेल का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड