शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ; १० ते १५ हजार मतदार 'इधर-उधर' चा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 12:31 IST

प्रभाग ८ मधील मध्यभागातील तीन हजारांहून अधिक नावे प्रभाग ७ मध्ये टाकण्यात आली असून, प्रभाग ७ मधील नावे १२ व्या प्रभागात गेल्याचेही उघड झाले आहे.

बाणेर :पुणे महापालिका  निवडणुकांसाठी २० नोव्हेंबरला जारी करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. प्रभाग क्रमांक ७, ८ आणि ९ मधील अंदाजे १० ते १५ हजार मतदारांची नाते चुकीच्या प्रभागात टाकल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

सूस-बाणेर-पाषाण (प्रभाग १) आणि औंध-बोपोडी (प्रभाग ८) परिसरातील अनेकांची नावे एकमेकांच्या प्रभागात दिसत असून, काही बाहेरील प्रभागातील नावेही ८ व ९ मध्ये आल्याचे निष्पन्न झाले आहे बाणेर-औंध सीमावर्ती भागातील मतदारांची नावे प्रभाग ८ मध्ये, तर पाषाण परिसरातील शेकडो नावे थेट प्रभाग ७ मध्ये टाकल्याचे निदर्शनास आले. इंदिरा वसाहत, गणेशखिंड हा भाग प्रभाग ७ मध्ये असूनही, येथील तब्बल ८०० ते ९०० मतदारांची नावे प्रभाग ९ मध्ये दिसून आली आहेत.तसेच औंधमधील सानेवाडी आणि शिवाजीनगर मतदारसंघातीलही अनेक नावे चुकीच्या प्रभागात दाखल झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.राज्य निवडणूक आयोगाकडून हरकती व सूचना महापालिकेकडे नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले असताना, अधिकाऱ्यांनी आयोगाच्या सॉफ्टवेअरमध्ये सेक्शन चार्ट देताना चुकीची नोंद झाल्याचे सांगत जबाब राज्य निवडणूक आयोगावर ढकलला आहे. निर्दोष मतदार यादी तयार करणे ही महानगरपालिकेची जबाबदारी असून, या चुकीमुळे इच्छुक उमेदवारांपुढे पेच आहे. 

अहिल्यानगरमधील नावे धक्कादायक गोष्ट म्हणजे प्रभाग ८ मधील यादीत, अहिल्यानगर जिल्ह्यातील काही नावे आढळल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रभाग ८ मधील मध्यभागातील तीन हजारांहून अधिक नावे प्रभाग ७ मध्ये टाकण्यात आली असून, प्रभाग ७ मधील नावे १२ व्या प्रभागात गेल्याचेही उघड झाले आहे.

तीन लाख दुबार नावांची वर्तवली शक्यतातीन लाख दुबार नावे असल्याची शक्यता, बीएलओंकडून तपासणी न झाल्याचा आरोप आणि फॉर्म क्रमांक ६ व ८ ची योग्य अंमलबजावणी न झाल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. मतदान हा नागरिकांचा मूलभूत हक्क असून, चुकीच्या प्रभागात नावे नोंदवल्याने मतदानापासून वंचित ठेवणे अमान्य असल्याचे केसकर यांनी म्हटले.

English
हिंदी सारांश
Web Title : Voter list chaos: Thousands misplaced before Pune Municipal Elections.

Web Summary : Major discrepancies plague Pune's voter lists. Thousands of voters are wrongly assigned. Residents allege 10-15,000 names misplaced across wards. Authorities blame software glitches, raising concerns about fair elections.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे