शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

ऑलनाइन कामकाज आणि मूल्यमापन निश्चित होणार;महसूल, नोंदणी व भूमी अभिलेखसाठी समितीची स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 09:00 IST

या समितीच्या अध्यक्षस्थानी भूमी अभिलेख विभागाचे आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पुणे : राज्य सरकारतर्फे राबविण्यात येत असलेल्या महाराजस्व अभियानांतर्गत ‘माझी जमीन माझा हक्क’ या मोहिमेसाठी महसूल विभागाने राज्यस्तरीय समिती स्थापन केली आहे. या समितीच्या अध्यक्षस्थानी भूमी अभिलेख विभागाचे आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महसूल, मुद्रांक व नोंदणी विभाग तसेच भूमी अभिलेख विभागातील कामकाज नीटपणे व्हावे यासाठी ही समिती कार्यपद्धती निश्चित करणार आहे. तसेच तिन्ही विभागांमार्फत करण्यात येत असलेल्या कामांची ऑनलाइन प्रक्रिया तसेच मूल्यमापन करण्याची पद्धतीही निश्चित करणार आहे.महसूल आणि भूमी अभिलेख विभागामार्फत शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांची जमीनविषयक कामे करण्यासाठी विविध कायदे नियम, शासन निर्णय, परिपत्रके, आतापर्यंत प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार कामकाज करण्यात येत असते. मात्र, महसूल विभागाचे कामकाज सामान्य नागरिकांना समजावे, त्यातील किचकट नियम लागलीच समजावीत, यासाठी राज्य सरकारच्या वतीने दरवर्षी महाराजस्व अभियान राबविण्यात येत असते. मात्र, हे अभियान अल्प काळासाठी असते. ही बाब लक्षात घेऊन महसूल, मुद्रांक व नोंदणी विभाग तसेच भूमी अभिलेख विभागातील कामकाज नीटपणे व्हावे यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे. समिती करणार हे कामकाज-महसूल, मुद्रांक व नोंदणी आणि भूमी अभिलेख विभागाशी निगडित निवडक कामांचा शोध घेऊन ती कामे निश्चित करणे-महाराष्ट्र जमीन अधिनियमातील तरतुदी, तसेच इतर कायद्यातील तरतुदी, शासन निर्णय, नियम, परिपत्रके यांचा अभ्यास करणे-विविध कामांच्या अंमलबजावणीसाठी ऑनलाइन प्रणाली तयार करणे-निवडण्यात आलेल्या कामांचे मूल्यमापन करणे तसेच त्याची मानके निश्चित करणेअशी आहे समितीडॉ. सुहास दिवसे (अध्यक्ष), सर्व महसूल उपायुक्त (सदस्य), मनीषा जायभाये (सदस्य), सत्यनारायण बजाज (सदस्य), संजय बनकर (सदस्य), दौलत देसाई (अशासकीय सदस्य), अजय गुल्हाणे (अशासकीय सदस्य), जगदीश संगीतराव (अशासकीय सदस्य), पी. आर. कुलकर्णी (अशासकीय सदस्य), भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक (सदस्य सचिव)

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र