शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

सोमेश्वर कारखान्यात ५४ लाखांचा अपहार दोषींवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 18:41 IST

टाइम ऑफिसमधील अपहार प्रकरणी सहाजण आणि एक कंत्राटदार या सर्वांना एकाच वेळी निलंबित करत त्यांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला होता.

सोमेश्वरनगर : सोमेश्वर सहकारी कारखान्याच्या टाइम ऑफिसमध्ये ५४ लाख ४७ हजार रुपयांचा आपहार झाल्याप्रकरणी संचालक मंडळाने कठोर भूमिका घेत या अपहारात प्रत्यक्ष सहभागी असलेल्या दोघांवर कारवाई करत त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवार (दि. १६) रोजी संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत चौकशी समितीने चौकशी अहवाल सादर केला. यामध्ये दोषी नसलेल्या विलास महादेव निकम, सुरेश बाबूराव होळकर, दीपक रवींद्र भोसले आणि मानसिंग कृष्णराव बनकर या चार कामगारांना तत्काळ कामावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सोमेश्वर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी दिली.

कारखान्याने स्थापन केलेल्या ॲड. मंगेश चव्हाण चौकशी समितीने अपहाराचा ठपका असणाऱ्या कामगार अधिकारी दीपक निंबाळकर व कर्मचारी रूपचंद साळुंखे यांनाही आपली बाजू मांडण्याची संधी दिली होती. इतर चार कामगारांची खात्याअंतर्गत चौकशी झाली. रूपचंद साळुंखे याने केलेल्या अपहाराची रक्कम मिळून ५४ लाख ४७ हजार रुपयांची वसुली करण्यात कारखान्याला यश आले होते. कारखान्याने स्थापन केलेल्या चौकशी समितीकडून व संचालक मंडळाकडून दोषींवर काय कारवाई होणार याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे. रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या नावापुढे बोगस हजेरी दाखवून त्याचे पैसे उकळण्याचा प्रकार टाइम ऑफिसमध्ये घडला होता. यानंतर कारखान्याच्या संचालक मंडळाने टाइम ऑफिसमधील अपहार प्रकरणी सहाजण आणि एक कंत्राटदार या सर्वांना एकाच वेळी निलंबित करत त्यांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला होता.

साखर आयुक्तालयाच्या पॅनलवरील मेहता-शहा चार्टर्ड अकौटंट कंपनीने डिसेंबर २०१७ ते जानेवारी २०२५ या आठ वर्षे कालावधीतील कारभाराची तपासणी केली. यामध्ये ५४ लाख २९ हजार रुपयांचा अपहार झाल्याचे निश्चित झाले होते. विधिज्ञ ॲड. मिलिंद पवार यांच्या समितीने कर्तव्यात कुचराई केल्याचा ठपका कामगार अधिकारी दीपक निंबाळकर यांच्यावर तर अपहाराचा ठपका रूपचंद साळुंखे याच्यावर ठेवला होता.पवार यांच्या समितीने दिलेल्या अहवालानुसार चारजणांना निर्दोष मुक्त करण्यात आले असून, त्यांना पुढील आठवड्यापासून कामावर घेण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत झाला आहे. मंडळाच्या बैठकीत ज्यांनी अपहार केला आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करायची आहे का नाही याबाबत कारखान्याच्या सल्लागार वकिलांचा सल्ला घेऊन पुढील कायदेशीर कार्यवाही करण्याचा निर्णय होणार आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड