शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

केळवडेजवळ महामार्गालगतच्या सेवा रस्त्यावरील पुलाचा स्लॅब कोसळला;कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 11:52 IST

सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या निकृष्ट कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली

नसरापूर : सातारा-पुणे महामार्गालगत केळवडे (ता. भोर) येथील कृष्णाई हॉटेलजवळ असणाऱ्या सेवा रस्त्यावरील पुलाचा स्लॅब अचानक कोसळल्याने मोठा खड्डा निर्माण झाला आहे. या घटनेमुळे महामार्गाच्या कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या निकृष्ट कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळी घडलेल्या या घटनेत पुलाच्या स्लॅबमधील तारा उघड्या पडल्या असून, ठिकठिकाणी भगदाड पडले आहे. या रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी असल्याने मोठा अनर्थ टळला. स्थानिक हॉटेल कर्मचाऱ्यांनी तातडीने खड्ड्याभोवती दगड आणि इतर वस्तू ठेवून अपघात टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, कंपनीला सकाळपासून माहिती देऊनही दुरुस्तीसाठी एकही अधिकारी घटनास्थळी पोहोचला नाही, अशी माहिती स्थानिक सामाजिक कार्यकर्ते संजय जगताप यांनी दिली.सातारा-पुणे महामार्गावरील कामे नेहमीच निकृष्ट दर्जामुळे चर्चेत राहिली आहेत. ‘‘पाण्यासारखा पैसा खर्च करूनही अशा प्रकारची कामे होत असतील, तर याला जबाबदार कोण?’’ असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. सुरक्षेच्या उपाययोजना तातडीने न केल्यास भविष्यात मोठा अनर्थ घडू शकतो, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड